मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची एका वेगळ्या कारणामुळे कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्यांच्यावर असभ्य वर्तणूकीचा करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच आरोपांबद्दल तिने आपली माफी मागावी अशी मागणी करणारी कायदेशीर नोटीस नानांनी तनुश्रीला पाठवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 


'तनुश्रीने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून तिने पुरवलेली माहितीही खोटी आहे. तिच्या आरोपांमुळे नानां पाटेकर यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे तिने या प्रकरणी जाहीर माफी मागावी', असं नमूद करण्यात आलेली कायदेशी नोटीस तिला पाठवण्यात आली आहे. 


माध्यमांशी संवाद साधताना शिरोडकर यांनी याविषयीची माहिती दिली. 


सध्याच्या घडीला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणं अयोग्य ठरेल. 


तनुश्री नेमकं असं का करत आहे, याची कोणतीच कल्पना नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 


दरम्यान, नाना पाटेकर लवकरच मुंबईत परतणार असून, या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तेव्हा आता कलाविश्वासह अनेकांच्याच नजरा नानांच्या या पत्रकार परिषदेकडे लागून राहिल्या आहेत.