Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्याचा OMG 2 हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगलेली आहे. पंकज त्रिपाठी यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून आणि वेबमालिकांतून अभिनय केला आहे आणि त्यांच्या या अभिनयाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यांच्या अस्सल अभिनयानं प्रेक्षक त्यांचे मोठे फॅन्स आहेत. त्यांचे हिंदी भाषेवरही चांगलीच प्रभुत्व आहे. 2018 साली दोन मोठ्या वेबसिरिज आल्या होत्या तेव्हा त्यांच्या लोकप्रियतेत तूफान वाढ झाली होती. Scared Games आणि Mirzapur या दोन मालिकांमुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. तेव्हा प्रेक्षकांना कळू लागले होते की पंकज त्रिपाठी नावाचा एक ताकदवान अभिनेता आहे. तेव्हापासून त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या पंकज त्रिपाठी यांची पुन्हा एकदा चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी त्यांनी आपल्या जन्मतारखेचा एक किस्सा सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आपल्यापैंकी अनेकांचे दोन वाढदिवस हे असतीलच. आपल्या नोंदणीनुसार आपला वाढदिवस हा वेगळा असतो आणि सोबतच आपला खरा वाढदिवस हा वेगळा असतो. पंकज त्रिपाठी यांच्याबाबतीतही असंच काहीतरी घडलं आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की काय घडलं होतं? तुम्हाला हे माहितीये का की पंकज त्रिपाठी यांचे दोन वाढदिवस आहेत. एक 5 सप्टेंबरला आहे आणि दुसरा 28 सप्टेंबर हा. त्यामुळे त्यांना याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी चर्चा होती ती म्हणजे त्यांच्या या दोन वाढदिवसांची. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 


हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकर आजही जपतोय 'तो' खजिना; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं केला शेअर


पंकज त्रिपाठींना Mashable युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिलेली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ''माझा जन्म 28 सप्टेंबर 1976 रोजी झाला. त्यामुळे 28 सप्टेंबरला माझा खरा वाढदिवस असतो. पण माझ्या लहानपणी शाळेच्या नावनोंदणीसाठी माझा भाऊ गेला होता. माझ्या भावाला तेथील बाईंनी माझी जन्मतारीख विचारली. तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते, माझा भाऊ शाळेतील बाईंना म्हणाला, मला सप्टेंबर महिना लक्षात आहे पण त्याची तारीख लक्षात नाही.


तेव्हा त्यांनी घरी न विचारता तिथल्याच कोणाचा तरी सल्ला ऐकून तारखेत 5 सप्टेंबर असा बदल केला. तेव्हापासून सगळ्यांना माझे दोन वाढदिवस आहेत असे वाटू लागले. 5 सप्टेंबरलाच ‘शिक्षक दिवस’ सुद्धा साजरा केला जातो त्यामुळे एका अर्थाने ही चांगली गोष्ट आहे. मी दोन्ही वाढदिवस साजरे करतो'', असं ते म्हणाले.