Archana Purun Singh Love Story: बॉलीवूडप्रमाणे टेलिव्हिजन कलाकारांच्या लव्ह स्टोरीज (Celebs Love Affairs) ही प्रेक्षकांना खूप रिलेट करतात. कधी मॉनी रॉय (Mouni Roy) असो वा अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). अभिनयासोबतच या अभिनेत्रींच्या पर्सनल लाईफचीही ती तितकीच चर्चा होते. लग्न, रिलेशनशिप यांपासून टेलिव्हिजन अभिनेत्रीही मागे नाहीत. यापैंकीच एक अभिनेत्री आहे अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh). (actor parmeet sethi married archana puran singh late night)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्चना पुरण सिंग या गेली तीसहून अधिक वर्षे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. टेलिव्हिजनसोबतच त्यांनी अनेक विनोदी चित्रपटांतूनही भुमिका केल्या आहेत. कपिल शर्मा (Kapil Sharma) या शोमधून त्या गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


अर्चना पूरण सिंह आणि त्यांचे पती परमीत सेठी (Parmeet Sethi) यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. परमीत सेठी आणि अर्चनाने द कपिल शर्मा शोमधूनच आपली प्रेमकहाणी शेअर केली होती. आपल्यापेक्षा सात वर्षे लहान अर्चना पुरण सिंग यांच्याशी परमीत सेठी यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांनी सांगितले की एका रात्रीच त्यांनी एकमेकांनी लग्नाची मागणी घातली आणि त्यादिवशीच त्यांनी आपला विवाहसोहळा पार पाडला होता. 


दोघेही एका रात्रीत कसे प्रेमात पडले आणि काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एका रात्रीत लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला याबाबत अर्चना पुरण सिंग यांनी खुलासा केला होता.


अर्चना पुरण सिंग म्हणाल्या की, 'आम्ही जेव्हा मंदिरात लग्नासाठी पोहचलो तेव्हा या दोन गोष्टी ऐकून पंडितजीही चक्रावून गेले'. अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी एका कॉमन फ्रेंडच्या घरी पार्टीत भेटले होते. अर्चना या तेव्हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. परमीतचे कुटुंब त्यांच्या नात्याच्या विरोधात होते कारण अर्चना परमीतपेक्षा वयानं मोठी होती. ज्या दिवशी परमीतच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार दिला त्याच दिवशी दोघांनीही लग्न करायचं ठरवलं होतं. 


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


अर्चनाने सांगितले की परमीतने तिला प्रपोज केले होते आणि पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं. रात्रीचं त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. याबाबत बोलताना परमीतने सांगितले की, 'आम्ही रात्री 11 वाजता लग्नाचा निर्णय घेतला होता. 12 वाजण्याच्या सुमारास एक पंडितजी भेटले.' आम्ही पळून जात असल्याचे त्यांना सांगितले आणि तेव्हाच त्यांनी आपला लग्नसोहळा संपन्न केला. आज त्या दोघांच्या लग्नाला 30 वर्षाहून अधिक काळ झाला आहे.