मुंबई :  बॉलिवूड कलाकारांचे चाहते साऱ्या जगभर पसरले आहेत. या लोकप्रितेच्या गर्दीच सध्या चर्चा होतेय ती अशा एका चेहऱ्याची ज्यानं बॉलिवूडमधील भल्याभल्या अभिनेत्यांना मागे टाकत बाजी मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौंदर्य आणि मादतेच्या बाबतीत बाजी मारणारा हा अभिनेता आहे, पॉल रुड. अमेरिकन अभिनेता पॉल रुड यानं अनेरिकेबाहेर असणाऱ्या चाहत्यांच्या मनावरही राज्य केलं आहे. 


अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांचा भाग असणाऱ्या पॉलनं आता असा किताब पटकावला आहे, जे पाहता सर्वांच्याच नजरा वळत आहेत. 


पॉलला sexiest man alive 2021हा किसात एका सुप्रसिद्ध मासिकाकडून देण्यात आला आहे. अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांना त्यानं मागे टाकलं आहे. 


कोणत्याही अभिनेत्यायला असा किताब मिळणं ही अतिशय मोठी आणि त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. पॉलसाठीही हा किताब, मादक पुरुष, अभिनेता म्हणून संबोधलं जाणं हे सारंकाही नवंच आहे. त्यानंच अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय होती पत्नीची प्रतिक्रिया ? 
52 वर्षीय पॉलला दोन मुलं आहेत. त्याला ज्यावेळी हा किताब मिळाला, तेव्हा त्यानं ही बाब सर्वप्रथन त्याच्या पत्नीला सांगितली. ज्यावेळी ती अतिशय थक्क झाली होती. चाहत्यांप्रमाणेच तिचीही प्रतिक्रिया होती. 


पॉलच्या कारकिर्दीबाबत सांगावं त्यांनी मार्वलच्या 'एंट-मॅन' चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यानं 'धीस इज 40', 'क्लूलेस' अशा चित्रपटांमध्येही काम केलं आहे. येत्या काळात तो एका सीरिजमध्येही झळकणार आहे.