मुंबई: नात्यांची वीण घट्ट असली की त्यामध्ये कितीही ओढाताण होवो, कितीही वादळं येवो ती काही सुटत नाही. अशाच एका सुरेख नात्यानं सध्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. हे नातं आहे बाप- लेकीचं. एका लोकप्रिय अभिनेत्याचं आणि त्याच्या मुलीचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील रामलीलेमध्ये ‘अंगद’च्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येत मनोरंजन करणाऱ्या गायक, अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी स्वत:च्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला.


तिवारी यांनी 2012 मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. ज्यानंतर त्यांची 8 वर्षांची मोठी मुलगी जिया  हिच्या आग्रहाखातर तिच्याच सांगण्यावरून त्यांनी दुसरं लग्न करण्याचं पाऊल उचललं. सुरभी असं त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव.



राणी तिवारी असं मनोज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव. या नात्याबाबत सांगताना ते म्हणाले, राणीसोबतचं माझं नातं 10 वर्षांपूर्वीच संपलं. पण, तरीही आमचं एक नातं मात्र चांगलं आहे. पहिल्या पत्नीपासूनची मुलगी जिया हिच्या संपर्कात आपण असल्याचं सांगितलं. जिया सध्या राणीसोबत राहत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


मागील वर्षी, 2020 मध्ये मनोज तिवारी यांनी सुरभीशी दुसरं लग्न केलं. ती एक गायिका असून, पतीच्या सर्व कायदेशीर कामांमध्ये हातभार लावते. जियाच्या सांगण्यावरूनच मनोज तिवारी यांनी सुरभीसोबत लग्न केलं. जिया आणि सुरभी यांचंही नातं खुप सुरेख असल्यांचं ते म्हणाले.