Prabhas Giving Big Opportunity : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अशी ओळख असलेला प्रभास हा सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. प्रभासचा बाहुबली  हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळेच त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या प्रभास हा 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्की या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. आता प्रभासने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता प्रभासचा कल्कि हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पाटनी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रभास वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वसामान्यांना त्याच्यासोबत काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. 



'कल्कि' या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मूव्हीसतर्फे केली जात आहे. 'वैजयंती मूव्हीस'ने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सर्वसामान्य लोकांनाही चित्रपटाचा एक भाग बनता येऊ शकते, असे सांगितले आहे. 


'येथे' पाठवा Resume


'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाला फ्रिलांस साऊंड डिझायनर आणि एडिटर्सची गरज आहे. त्यामुळे जर तुम्हाला साऊंड डिझाईनिंगबद्दल माहिती असेल तर तुम्ही आमची टीम जॉईन करु शकता. यासाठी तुम्हाला vymcrew@gmail.com यावर तुमची माहिती पाठवावी लागेल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 



हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक


दरम्यान प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानीही झळकणार आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नवा प्रोजेक्ट के असं ठेवण्यात आलं होतं. पण त्यानंतर या चित्रपटाच्या नावात बदल करत हे नाव कल्कि 2989 एडी असं करण्यात आलं आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट येत्या 9 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.