मुंबई : 'बाहुबली' या चित्रपचटाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभभिनेता प्रभास याचं नवं रूप पाहण्याची संधी लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. किंबहुना खुद्द प्रभासच एका नव्या सरप्राईजसह चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या सरप्राईजचा उल्लेख केल्यानंतर आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला ताणल्यानंतर त्याने एक खास गोष्ट सर्वांच्याच भेटीला आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'साहो' या आगामी चित्रपटाचा अधिकृत पोस्टर प्रभासने सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण कलाविश्वाचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही स्पष्ट करण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्याया चित्रपटात प्रभासचा लूक नेमका कसा असेल, याची झलकही त्याच्या या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. भेदक नजर त्याच्या या लूकला अधिक उठावदार आणि प्रभावी ठरवत आहे. 



तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये साहो प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये आशिकी गर्ल श्रद्धा कपूर प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. सुजित दिग्दर्शित या चित्रपटातून नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, अरुण विजय, संपत राज अशा कलाकारांची फौजही पाहता येणार आहे. 


'बाहुबली'प्रमाणेच प्रभासच्या 'साहो' या चित्रपटाचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जवळपास ३०० कोटींच्या निर्मितची खर्चातून साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून काही दमदार साहसदृश्यंही पाहता येणार आहेत. रुपेरी पडद्यावर या चित्रपटाला खिलाडी कुमारच्या 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' या चित्रपटांची टक्कर असणार आहे. तेव्हा आता कोण बाजी मारतो हे पाहणं तितकंच रंजक ठरणार हे खरं.