PHOTO : प्रतिक बब्बरच्या मेहंदी-हळदीचे फोटो व्हायरल
भाजप नेत्याची मुलगी असलेल्या सान्या सागरसोबत प्रतिक बब्बर अडकतोय विवाहबंधनात
मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटली आणि नेते-अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर याच्या घरी लगीनघाई सुरू झालीय. प्रतिक बसपा नेते पवन सागर यांची मुलगी सान्या सागर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकतोय. प्रतिक आणि सान्याचा विवाहसोहळा लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलाय. विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली असून मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रमही नुकताच पार पडलाय. प्रतिक - सान्याच्या मेहंदी-हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी अचानक प्रतिक - सान्याच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानं अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. प्रतिक - सान्या गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
लखनऊमध्ये भव्य विवाह समारंभ पार पडल्यानंतर मुंबईमध्ये एका रिसेप्शनची तयारी करण्यात आलीय. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून राजनेत्यांपर्यंत अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचं समजतंय.
कोण आहे सान्या सागर?
प्रतिक बब्बरनं गेल्या वर्षी 'मुल्क' या सिनेमातून अभिनयासाठी अनेकांकडून वाहवा मिळवली होती. तर प्रतिकची होणारी पत्नी सान्या ही एक लेखिका आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये क्रिएटीव्ह रायटर म्हणून नाव मिळवण्याचा प्रयत्न करतेय. सान्यानं गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनहून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय. सोबतच तिनं फिल्म अकादमीतून फिल्ममेकिंगमध्ये पदवी मिळवलीय. तिनं आपलं फिल्ममेकिंग स्पेशलायझेशन लंडनच्या अकादमीमधून केलंय.