Rajveer Deol: सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे नेपोटिझमची. मध्यंतरी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही नेपोटिझमवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. नेपोटिझम हा विषय सारखा चर्चिला जातो. मोठमोठे कलाकारही नेपोटिझमवर बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सनी देओलची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. यावर्षी त्याचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्यातून हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं तूफान कमाई केली आहे. काही वर्षांपुर्वी त्याचा मोठा मुलगा करण देओल यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. आता करण देओलचं लग्न झाल्यानंतर राजवीर देओल हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सध्या त्याची जोरात चर्चाही रंगलेली आहे. त्याचा 'दोनो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे या चित्रपटातून तो पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. यावेळी सध्या त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चाही रंगलेली आहे. 'न्यूज 18'ला त्यानं दिलेल्या एका मुलाखतीतून आपल्या डेब्यूबद्दल खुलासा केला आहे यावेळी त्यानं आपल्या डेब्यू आणि नेपोटेझिमवरही भाष्य केले आहे. करण देओलचा जेव्हा 2019 मध्ये पहिला चित्रपट आला होता, 'पल पल दिल के पास'. परंतु त्यानंतर हा चित्रपट फारसा काही चालला नाही त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चाही रंगलेली होती. परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही. यावेळी राजवीर देओलनंही आपलं स्पष्ट मतं मांडलं आहे. 


हेही वाचा : रणबीर कपूर झाला पुणेकर... 'हे' आहे खास कारण


राजवीर म्हणाला की करणला त्याचा रोल निवडायचं स्वातंत्र्य नव्हतं. जो रोल तो करत होता. त्यांना स्वत:ला त्याची क्रिएटिव्हिटी दाखवयला काहीच चान्स नव्हता. कारण माझ्या वडिलांप्रमाणे खूप मोठ मोठी लोकं ही या चित्रपटाचा भाग होती. जेव्हा मोठी लोकं हे चित्रपटाचा भाग असतात तेव्हा कलाकारांना आपलं असं काही दाखवायला स्कोप नसतो. त्याउलट करण हा फारच खुश होता. तो पुढे असंही म्हणाला की ते दोघंही एकमेकांना कायमच मदत करतात. त्यातून मला मी नशीबवान आहे की मी माझ्याच प्रोडक्शन हाऊसमधून लॉन्च होत नाहीये. कारण माझ्या भावाला आमच्याच प्रोडक्शन हाऊसमधून लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर त्याला फारच त्रास सहन करावा लागला होता. 


तो असंही म्हणाला की, ''मला फार आनंद आहे की मी या 'दोनो'साठी ओडिशन दिली. माझ्यात काही कमी आहे याबद्दल मला मी कुठे कमी आहे हे फील झालं नाही.''