Ranbir Kapoor Video : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारे कपल आहे. अनेकदा ते दोघे सार्वजनिक मेळाव्यात एकत्र दिसतात. 25 ऑक्टोबरला आलियाची आई सोनी राजदानचा 68 वा वाढदिवस होता. वाढदिवसाला रणबीर-आलियासोबत नीतू कपूर देखील उपस्थित होती. या कुटुंबाचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोनी राजदानचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


रणबीर कपूरला राग अनावर


सध्या सोशल मीडियावर रणबीर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया आणि नीतूशिवाय पूजा भट्टही दिसत आहे. यावेळी रणबीर पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. तर आलिया ही जांभळ्या रंगाच्या ग्रे शेड ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यावेळी ते आपल्या कारच्या दिशेने जात असताना तिथे उपस्थित असणाऱ्या जमावाने त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामध्ये आलियाचा आणि रणबीरच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. हे बघताच रणबीर कपूरला राग आला. तेवढ्यात आपला राग आटोक्यात ठेवत आलिया शांतपणे कारच्या दिशेने निघाली. मात्र, रणबीरला आपला राग आवरता आला नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांचा मार्ग अडवला. त्यामुळे आलिया भट्ट अस्वस्थ झाली. हे पाहून रणबीर चांगलाच भडकला आणि म्हणाला, काय करत आहात? यानंतर त्यांनी कारसमोर उभा असणाऱ्या एका फोटोग्राफरला ढकलून दिले आणि इकडे ये, असे सांगितले. यानंतर आलिया आणि रणबीर दोघे त्यांच्या कारमध्ये बसले. मात्र, यावेळी रणबीर कपूरच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. 


तू कोण आहेस? रणबीर कपूरच्या व्हिडीओवर कमेंट


आलिया आणि रणबीर कपूरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळया कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये काही चाहत्यांनी त्याच्या बाजूने कमेंट्स केल्या आहेत तर काही चाहत्यांनी त्याच्या विरोधात कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यांने लिहिले आहे की, प्रवृत्ती किती आहे. तू कोण आहेस? असा देखील प्रश्न त्याला विचारला आहे.