मुंबई : सध्या सगळीकडे कोणा वेब सीरिजची नव्हे, तर Shark Tank India या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सुरु आहे. उद्योग क्षेत्रात नव्या संकल्पनांना आणखी मोठं करण्याच्या उद्देशाने इथं अनेक तरुण येत आहेत. अर्थात मध्यमवयीन सहभागी व्यक्तीही या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यवसा क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं येणाऱ्या आणि खरंच त्यासाठी पात्र असलेल्यांना इथे गुंतवणुकदार तशाच मोठ्या संधीही देत आहेत. 


एकिकडे या कार्यक्रमाची सकारात्मक चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र 'रोडीज' फेम Rannvijay Singha यानं आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. 


रणविजय जे काही बोललाय ते पाहून नेटकऱ्यांनीही त्याला चांगलंच निशाण्यावर घेत शाळेपासूनची आठवण करुन दिली. 


रणविजयनं या कार्यक्रमात आलेल्या एका 26 वर्षीय इंजिनियरिंगची पदवी असणाऱ्या IIT तून पीएचडी झालेल्या तरुणाला एमबीए करण्याचा सल्ला दिला. 


सोशल मीडियावर या कार्यक्रमातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथे हा मुलगा फक्त पीएचडी धारक नसून, स्टॅनफर्ड विद्यापीठातूनही त्यानं शिक्षण घेतल्याचं सांगितलं जात आहे. 


जो स्वत: पीएचडी धारक आहे, ज्यानं जगातील सर्वात जुन्या विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे, तो या एमबीएचं आता काय करणार? हाच प्रश्न आता त्याला नेटकरी विचारत आहेत. 



हे म्हणजे तुम्हाला संधी दिली म्हणून काहीही बोलणार का, अशा बोचऱ्या प्रश्नांचा मारा सध्या रणविजयवर होताना दिसत आहे. 


दरम्यान, एकिकडून त्याची जोरदार खिल्ली उडवली जात असतानाच दुसरीकडे रणविजयनं रोडिजपासून दुरावा पत्करल्याचं कळत आहे. 


स्पर्धक, विजेता, सूत्रसंचालक असा त्याचा या कार्यक्रमातील 18 वर्षांचा प्रवास आता संपुष्टात आला आहे.