मुंबई : सध्या सोशल मीडियावर चित्रपटांच्या कथा खूप गाजत आहेत. असाच एक किस्सा बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी संबंधित आहे. रफू चक्कर या चित्रपटात जेव्हा ऋषी कपूर यांना मुलीचा गेटअप करावा लागला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो होता. बॉलिवूड स्टार्सना एखादी भूमिका साकारण्यासाठी जमेल ते प्रयत्न करावे लागतात, जे काही कॅमेऱ्यासमोर घडते ते आपल्याला पडद्यावर पाहायला मिळते.


पण या कॅमेऱ्याच्या मागे अनेक रंजक किस्से आहेत जे सिनेमा रिलीजनंतर व्हायरल होत असतात. कारण ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी स्टार्सना खूप मेहनत करावी लागते.


असाच एक किस्सा बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या 'रफुचक्कर' या चित्रपटाच्या शुटींगवेळी घडला होता. ज्यामध्ये त्यांनी मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर मुलींच्या गेटअपमध्ये आल्यानंतर ऋषी कपूर यांच्यासमोर अनेक समस्या येऊ लागल्या.


त्यावेळी ऋषी कपूर यांना मुलीची भूमिका साकारणे सोपे नव्हते, पण अभिनेता असल्याने त्यांना त्यांच्या भूमिकेला न्याय द्यावा लागला. अशा परिस्थितीत या चित्रपटात मुलीची भूमिका साकारण्यासाठी होकार देऊन त्यांनी आपली चॉकलेट बॉय इमेज मागे टाकली.


रफू चक्कर या सिनेमामध्ये एका मुलीची भूमिका साकारली होती, पण जेव्हा काश्मीरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा ऋषी कपूर यांना वॉशरूममध्ये जायचे होते, पण त्यादरम्यान ते पूर्ण मुलीच्या गेटअपमध्ये होते. त्यांनी मुलींप्रमाणे कपडे घातले होते.


अशा स्थितीत ते मुलीच्या गेटअपमध्ये वॉशरूममध्ये जाण्यास थोडे घाबरत होते. ऋषी कपूर मुलीच्या गेटमध्ये होते पण ते मुलीच्या वॉशरूममध्ये जाऊ शकले नाहीत.



त्यामुळे त्यांनी जेंट्स वॉशरूममध्ये जाण्याचं ठरवलं आणि जेव्हा ऋषी कपूर एक मुलगी म्हणून जेंट्स वॉशरूममध्ये गेले तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक त्यांना पाहून हैराण झाले. तर काही जण तेथून पळून गेले.