बॉलिवूड अभिनेत्याचा 1100 कोटींचा चित्रपट, पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, पाहा कुठे आणि कधी?
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली आहे.
Jawan Release In Japan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि नयनताराही दिसल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता हा चित्रपट जपानमधील थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.
नुकतेच शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये जपानमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्याने म्हटलं आहे की, त्यांचा 'जवान' हा चित्रपट 29 नोव्हेंबर 2024 रोजी जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
'जवान' चित्रपटाची देशभरात 1100 कोटींची कमाई
शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये शाहरुख खानने जबरदस्त अभिनय केला होता. या चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका साकारली होती. त्यासोबतच प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर, संजीता भट्टाचार्य आणि रिद्धि डोगरा देखील या चित्रपटात होते. तसेच साउथ अभिनेता विजय सेतुपतीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने देशभरात 1100 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 1148.23 कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानचा हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी किंग चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुलगी सुहाना खानसोबत तो या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभय वर्मा देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या वाढदिवसाला 2 नोव्हेंबरला या चित्रपटाची घोषणा केली जाऊ शकते.