Sharad Kapoor : 'जोश' फेम शरद कपूरवर एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'एलओसी कारगिल', 'लक्ष्य' सारख्या हिट चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्यावर एका 32 वर्षीय महिलेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या खार पोलिसांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेबाबत महिलेने सांगितले की, अभिनेत्याने तिला आपल्या घरी बोलावले आणि तिच्याशी गैरवर्तन केले आणि जबरदस्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. महिला पुढे म्हणाली की, ती फेसबूकच्या माध्यमातून शरद कपूरच्या संपर्कात आली. त्यानंतर दोघांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारेही बोलणे झाले. शूटिंगबद्दल बोलण्यासाठी शरद कपूरने त्या महिलेला भेटायला बोलावले. लोकेशन पाठवले आणि खार येथील ऑफिसमध्ये येण्यास सांगितले.


महिलेचा आरोप काय? 


जेव्हा ती महिला तेथे गेली तेव्हा तिला समजले की हे शरद कपूरचे कार्यालय नसून त्याचे घर आहे. ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात पोहोचल्यावर एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि आतून शरद कपूरने हाक मारली आणि तिला बेडरूममध्ये येण्यास सांगितले. यानंतर महिलेने हा संपूर्ण प्रकार तिच्या एका मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर जवळच्या खार पोलीस ठाण्यात अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली.


शरद कपूरवर गुन्हा दाखल 


शरद कपूरवर गुन्हा दाखल झाला असून याबाबत अद्याप शरद कपूरने कोणतीही माहिती दिलेली नाहीये. शरद कपूरवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 अंतर्गत महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा बळजबरी कलम 75 लैंगिक छळ आणि कलम 79 कोणत्याही महिलेचा अपमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.