Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 सीझनचे प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढवत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमाविषयी नागरिकांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचे हे पर्व वेगळे असणार आहे. कारण या वेळी या शोचे होस्टिंग हे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे नसून ते बॉलिवूड अभिनेता आणि मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे असणार आहे. बिग बॉस मराठी 5 हा सीझन 100 दिवस चालणार आहे. 100 दिवसांच्या या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. परंतु सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लेटेस्ट पोस्टमधून बिग बॉस मराठीमध्ये तो एन्ट्री घेणार असल्याची हिंट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्याचे नाव बिग बॉस मराठी 5 सीझनमध्ये जोडले जात होते. मात्र, आता अभिनेता शुभंकर तावडे याने इन्स्टाग्रामवर स्टोरीमधून बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री करणार असल्याची हिंट दिली आहे. 28 जुलैपासून तो बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण त्याने केलेल्या पोस्टनंतर त्याच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचं म्हटलं जात आहे. 


शुभंकरची पोस्ट व्हायरल 


प्रसिद्ध अभिनेता शुभंकर तावडे याने 25 जुलै रोजी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने हा सीझन जरा वेगळा असणार आहे. मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी वेगळे काहीतरी आहे? परंतु जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे. 



या स्टोरीमध्ये त्याच्या इंग्रजी वाक्यामुळे चाहत्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये Whatever it is I will bb definitely going somewhere. या वाक्यामध्ये be शब्दाच्या जाही bb असा शब्द वापरला आहे. त्यामुळे दोन्ही शब्दप्रयोगावरून शुभंकर बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये दिसणार हे नक्की झाले आहे. 


शुभंकरच्या पोस्टमुळे कलर्स मराठीची पोस्ट चर्चेत


काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या वाहिनीवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामधून देखील शुभंकरच्या नावाची हिंट मिळाली होती. या पोस्टमध्ये वेड लावणारं प्रेम तर त्याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण? अस म्हटलं होतं. त्याचबरोबर या पोस्टला वेड चित्रपटामधील गाणे लावले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या प्रोमोनंतर शुभंकरच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता थेट शुभंकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना हिंट दिली आहे.