मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता सीजेन खान म्हणजे मालिकेमध्ये अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेमधील प्रेरणा आणि अनुरागच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलचं डोक्यावर धरलं होतं. मालिकेमधील प्रेरणा ही व्यक्तीरेखी अभिनेत्री श्वेता तिवारीने साकारली होती. त्यावेळी प्रेरणा आणि आनुराग या जोडीने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे सीजेन खानच्या लग्नाची. वयाच्या 42 व्या सीजेन त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. मात्र अद्याप त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, हे गुलदस्त्यात आहे. सिजेन २०२० मध्ये लग्न करणार होता पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याने लग्नाचा प्लॅन पुढे ढकला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


सीजेनला बिग बॉस १४ची ऑफर आली होती. पण सिझनमध्ये सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे सांगत त्याने ऑफरला  नकार दिला. एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. सीजेन दुबईमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.