मुंबई : पुन्हा एकदा मुंबई हे शहर महिलांसाठी असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुमित राघवनने आपली पत्नी आणि अभिनेत्री चिन्मयी सुमितसोबत घडलेला प्रकार ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. या ट्विटने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहे. याबाबत सुमीत राघवनने पोलिसांना टॅग करून माहिती दिली आहे. 



काय म्हटलंय ट्विटमध्ये?


एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरूवात केली. पार्ले टिळक शाळेजवळ ही गाडी उभी होती. चिन्मयी यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तिला हटकलेही. त्या मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या अज्ञात व्यक्तिने तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने त्याने राखाडी रंगाचा सफारी घातलू होता.


सुमित राघवनने हा सगळा प्रकार आपल्या ट्विटर अकाऊंटवरून समोर आणला आहे. या संदर्भात त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग करून कळवलं आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे पार्ले टिळक विद्यालय आहे. त्यामुळे हा प्रकार त्या शाळेतील विद्यार्थिनींसोबत देखील घडला आहे. त्यामुळे या इसमाने हा विकृत प्रकार त्यांच्यासमोरदेखील केला असा असावा,’ असा संशय सुमीत यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.