`या` अभिनेत्याने का घेतली चाहत्याच्या मुलीची जबाबादरी? कारण थक्क करणारं
चाहत्याच्या मुलीची जबाबदारी आता प्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर, का घेतला एवढा मोठा निर्णय?
मुंबई : सुपरस्टार सूर्याचे देशभरात असंख्य चाहते आहेत. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या सुखः दुःखात सामील होतो. नुकताचं सूर्याच्या एका चाहत्याचं निधन झालं आहे. तेव्हा चाहत्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी अभिनेता स्वतःला रोखू शकला नाही. सुर्याने थेट चाहत्यांचं घर गाठलं आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाला. एवढंच नाही तर सूर्याने आता चाहत्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सूर्याचा डाय हार्ड फॅन जगदीश, जो अभिनेत्याच्या फॅन क्लबचा सचिव होता, त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सूर्याला ही दुर्दैवी घटना कळताच तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी जगदीशच्या घरी पोहोचला.
सूर्याने फक्त चाहत्याच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिलं. रिपोर्टनुसार, सूर्याने जगदीशच्या पत्नीला नोकरी देण्याचे वचन दिले आहे. चाहत्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही तो उचलणार असल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सूर्या त्याचा चाहता जगदीशच्या फोटोला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. सूर्याचा माणुसकीचा स्वभाव त्याच्या अन्य चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या सूर्या चित्रपट निर्माता बालासोबत एका नवीन सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्याचे नाव अद्याप घोषित करण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी रिलीज झालेला सुर्याचा 'जय भीम' सिनेमा प्रचंड चर्चेत होता. 'जय भीम' सिनेमामध्ये त्याने एका वकिलाची भूमिका केली आहे, ज्याने सिनेमात एका गरीब जोडप्याला त्यांचा न्याय मिळवून दिला.