मुंबई : 'पवित्र रिश्ता' मालिकेतून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता अभिनेता सुशांत सिंह राजपूतने  केली आत्महत्या आत्महत्या केली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. त्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडला त्याचप्रमाणे चाहत्यांना  मोठा धक्का बसला आहे. त्याने घरात गळफास घेवून आपला प्रवास संपवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतने गेल्या वर्षी 'छिछोरे' चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. सुशांतच्या या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. सुशांतच्या नोकराच्या सांगण्यानुसार ते गेल्या काही दिवसांपासून फार  मानसिक तणावात हेता. यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न देखील करत होता. 


महत्त्वाचं म्हणजे पाच दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने देशील आत्महत्या केली. ८ जून  रोजी त्याच्या मॅनेजरने राहत्या इमारतीवरून उडी मारून त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यानंतर लगेच आता सुशांतने आत्महत्या केल्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे.