मुंबई : कोणालाच ठावूक नाही हे का झालं... पण २०२० या वर्षाने बॉलिवूडला मात्र मोठे धक्के दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण कलाविश्वात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान  अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी समोर येताच बॉलिवूडला त्याचप्रमाणे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किस देश मे है मेरा दिल मालिकेतून त्याने कलाविश्वात पदापर्ण केलं, त्यानंतर पवित्र रिश्ता मालिकेतून तो प्रसिद्ध झोतात आला. काय पो चे चित्रपटामधून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. शिवया त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार होता पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याने हे जग सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक मुकेश छाबरा दिग्दर्शित चित्रपटाची कथा विनोद आणि रोमान्स भोवती फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओजच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. शिवाय २०१२ साली प्रकाशित झालेल्या जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' कादंबरीवर चित्रपटाची आधारलेली आहे. 


सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्ताने कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट झाले नसले तरी नैराश्याच्या भरात त्याने आत्महत्या केल्याा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


शिवाय त्याची एक्स मॅनेजर दिशा सलियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दिशा आपल्या जोडीदारासोबत मालाडमध्ये राहत होती. दिशाने आपल्या राहत्या घराच्या १४ व्या माळ्यावरून आत्महत्या केली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली असताना आता सुशांत सिंहच्या आत्महत्येची घटना घडली आहे.