दिशा पटानीसोबत ब्रेकअप होताच टायगर श्रॉफ `या` बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात?
दिशा पटानी नव्हे तर आता टायगर श्रॉफ `या` अभिनेत्रीसोबत करणार लग्न?
Entertainment News : अभिनेता टायगर श्रॉफ दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर त्याच्या सिंगल स्टेटसचा आनंद घेत आहे. टायगरनेही स्वत:साठी नवीन जोडीदार शोधण्यास सुरुवात केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दिशासोबत वेगळा झाल्यानंतर टायगर दुसऱ्या अभिनेत्रीमध्ये गुंतला असल्याचं बोललं जात होतं. मात्र यावर स्वत: टायगरने खुलासा केला आहे.
टायगर श्रॉफ करण जोहरच्या 'स्पाइसी शो कॉफी विथ करण'मध्ये दिसणार आहे. कॉफी विथ करणच्या सोफ्यावर टायगर श्रॉफ त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसणार आहे. करण जोहरच्या शोमध्ये टायगरनेही शेवटी त्याचे रिलेशनशिप स्टेटसबाबत उघडपणे बोलला आहे.
टायगरने या शोमध्ये खुलासा केला की, मी आता सिंगल असून बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मला आवडते आणि तिच्याबद्दल आकर्षण वाटत असल्याचं टायगरने सांगितलं. दिशा आणि मी आता वेगळे झालो असून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचंही टायगर म्हणाला.
टायगर श्रॉफने 2014 साली 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लवकरच 'गणपत' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टायगरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक किती प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.