मुंबई : आजच्या जीवनशैलीतील अविभाज्य घटक म्हणजे सोशल मीडिया. सामान्य जनतेपासून ते बड्या सेलिब्रिंटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या मनातील चांगल्या वाईट भावना सोशल मीडियावर व्यक्त करत असतो. अभिनेता वरूण धवनने देखील त्यांच्या आष्यातील काही दुःखद क्षण इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले आहे. त्याने त्याच्या मावशीच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर सांगत शोक व्यक्त केला आहे. शिवाय त्याने मावशीसोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तो मावशीला मिठी मारताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावशीसोबत फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'मावशी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...' असं म्हणत गायत्री मंत्र देखील लिहिले आहे. वरूणच्या या दुःखात बॉलिवूडकरांनी त्याला धिर दिला आहे. अभिनेत्री सोनम कपूर, नुसरत भरुचा यांनी वरूणच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या वरूणची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. 



वरूण नेहमी आपल्या मावशीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. गेल्या वर्षी देखील त्याने मातृ दिनाचे औचित्य साधत मावशीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. 'मावशी ही कायम आईसारखीच असते...' असं म्हणत त्याने मावशीला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 


दरम्यान, लॉकडाऊनंतर वरूण 'कुली नं १' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सारा अली खान आणि वरूण एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.