मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. लग्नानंतर या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटोही पोस्ट केले. अतिशय सुरेख अशा या फोटोंमुळं त्यांच्या लग्नाचा थाट सर्वांनाच पाहता आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनानं पोस्ट केलेल्या काही फोटोंपैकी एका फोटोमध्ये कौशल कुटुंबात येत्या काळात नव्यानं एंट्री घेणारा चेहराही दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा चेहरा आहे विकीच्या भावाच्या प्रेयसीचा. 


आपल्या निरागस सौंदर्यानं सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री आहे शर्वरी वाघ. 


कतरिनानं तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये शर्वरी कॅटच्याच शेजारी दिसत आहे. 


शर्वरी एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी आहे. ज्या कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणातही मानाचं स्थान आहे. 


14 जून 1996 ला जन्मलेल्या शर्वरीनं अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये नाव उंचावलं आहे. 


माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांची ती नात आहे. 



मुंबईच्या दादर येथील पारसी यूथ असेम्ब्ली हायस्कूलमध्ये तिनं शिक्षण घेतलं आहे. यानंतर रुपारेल महाविद्यालयातून तिनं पुढील शिक्षण घेतलं आहे. 


शर्वरी आणि सनीच्या नात्याला सध्या बरीच हवा मिळत आहे. त्यातच विकी आणि कतरिनाच्या लग्नामध्ये असणारी तिची उपस्थिती बऱ्याच गोष्टी स्पष्ट करुन गेली. तेव्हा आता खरंच कौशल कुटुंबामध्ये शर्वरीच्या रुपानं दुसऱ्या सुनेचीही एंट्री होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.