मुंबई : लोकप्रिय कलाकार आणि त्यांच्याभोवती असणारा चाहत्यांचा गराडा ही काही नवी बाब नाही. पण, अनेकदा काही चाहते कलाकारांच्या पुढे अडचणींचं चित्र उभं करताना दिसतात. असाच एक प्रसंग नुकताच बंगळुरू विमानतळावर घडल्याचं पाहायला मिळालं. जिथं एका सुपरस्टाक अभिनेत्याला विचित्र प्रसंगाला सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथे विजय जेव्हा विमानतळावरुन बाहेर येण्यासाठी म्हणून पुढे होतो तेव्हाच एक अज्ञात व्यक्ती मागून येऊन त्याच्यावर हल्ला करताना दिसतो.


विमानतळारवर घडलेला हा प्रसंग विजयसाठीही धक्कादायक होता. मुख्य म्हणजे विजयसोबत असणाऱ्या व्यक्तीनं या हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी असं काही करण्यापासून त्यांना थांबवलं. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळुरू येथे गेला होता.


एका मद्यधुंद प्रवाशानंच हा सारा गोंधळ घातला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रवाशानं झाल्या प्रकरणानंतर माफी मागितली तेव्हा कुठे झाला प्रकार शमला.



विजय सेतुपतीचे सहकारी आणि सदर व्यक्तीमध्ये काही कारणानं बाचाबाची झाली, त्यानंतर या वादाला हवा मिळाल्याचं प्रत्यक्शदर्शींचं मत आहे. या सर्व वादानंतर त्या व्यक्तीनं सेतुपतीवर हल्ला केला.