मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या अदा तिच्या फोटोंमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अदानं असं काही केलं की लोकांना विश्वास बसत नाही आहे. अदाला भाऊ नाही म्हणून ती रस्त्यावर रक्षाबंधन साजरा करत असल्याचे दिसत आहे. अदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Adah Sharma Rakshabandhan Video)


आणखी वाचा : Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्षाबंधन निमित्तानं अदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अदा मुंबईच्या रस्त्यावर ऑटोरिक्षा चालकाला राखी बांधताना दिसत आहे.  काही नेटकऱ्यांना अदाची ही स्टाईल आवडली तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 



अदानं नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा तिला भाऊ नसल्याचं सांगताना दिसत आहे, त्यामुळे ती मुंबईच्या रस्त्यावर अनेक रिक्षाचालकांना राखी बांधताना दिसत आहे. एवढंच नाही तर अदा या ऑटोवाल्यांकडून सुरक्षेचे आश्वासनही घेताना दिसत आहे. अदा म्हणाली, 'आम्ही मुली मुंबईच्या रस्त्यावर सुरक्षितपणे प्रवास करू शकलो ते केवळ या लोकांमुळे. याबद्दल धन्यवाद. आम्ही मुली खूप भाग्यवान आहोत. (Adah Sharma Instagram Rakshabandhan Video)


बॉलिवूड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी अदा एक आहे. अदानं काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2008 मध्ये अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. '1920' या चित्रपटातून अदानं तिच्या करिअरची सुरुवात केली. अदानं 'कमांडो 2', 'हसी तो फसी' आणि 'हम हैं राही कार के' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अदानं बॉलिवूडपेक्षा जास्त काम दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये केलं आहे. अदा दाक्षिणात्य स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) बऱ्याचवेळा स्क्रीनवर दिसली आहे.