दर पाचव्या मिनिटाला गमावले 10 हजार रुपये; ऑनलाईन फ्रॉडनं अभिनेत्रीवर संकटांचा डोंगर
Akanksha Juneja Cyber Fraud : आकांक्षा जुनेजा ही `साथ निभाना साथिया 2` आणि `कुंडली भाग्य` या मालिकांसाठी ओळखली जाते. दरम्यान, आकांक्षाची ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना फसवणूक झाली आहे. त्याविषयी तिनं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
Akanksha Juneja : भारतात सतत अनेकांसोबत फ्रॉड होतात. बऱ्याचवेळा आपल्याला कळतही नाही की अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते. यात वयस्कर लोकांची संख्या जास्त आहे. ते न कळत अनेकांना ओटीपी देतात किंवा मग अकाऊंटची माहिती आणि त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे गायब होतात. मग फक्त वयस्कर लोकचं याचा बळी होतात असं नाही तर त्यात अनेक लोक आहेत. त्यापैकी काही हे तरुणाईतील मुलं देखील असतात. मग त्यात सेलिब्रिटींची नावं देखील येतात. अशा प्रकारची फसवणूकीचे शिकार झालेले अनेक कलाकार आहेत आणि आता त्यात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आकांक्षा जुनेचे देखील नाव आहे. आकांक्षा ही सायबर फ्रॉडचा शिकार झाली आहे. आकांक्षा जुने ही 'साथ निभाना साथिया 2' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या मालिकांसाठी ओळखली जाते.
आकांक्षानं याविषयी स्वत: तिची फसवणूक झाल्याचे सांगितलं आहे. आकांक्षा जेव्हा जेवण ऑर्डर करत होती त्यावेळी तिच्यासोबत असं झालं आहे. आकांक्षानं सांगितलं की 10 मिनिटांच्या अंतरावर तिच्या अकाऊंटमधून हळू हळू 10 हजार असे 30 हजार गेले. गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमची घटना वाढल्याचे दिसत आहे. अनेक कलाकार हे अशा फसवणूकीचा शिकार झाले आहेत. आकांक्षानं या घटनेविषयी बोलताना एका माध्यमाला सांगितले की तिनं नुकतंच जेवण ऑर्डर केलं होतं. त्यानंतर जेवण ऑर्डरचं कन्फर्मेशन करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या लिंकवर तिला क्लिक करण्यास सांगितले. तिनं समोरच्या व्यक्तीला विचारलं की असं करणं का महत्त्वाचं आहे. तर फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये जेवण ऑर्डर केल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन करणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : 'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई
आकांक्षानं त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच तिच्या अकाऊंटमधून पैसे जाऊ लागले. आकांक्षा तिच्यावर आलेल्या या आपबीतीविषयी बोलताना सांगितले की जेव्हा मी लिंकवर क्लिक केले, त्यानंतर माझ्या अकाऊंटवरून दर 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर पैसे कट होऊ लागले. त्यानंतर तिनं तिच्या बॅंकेशी संपर्क केला आणि तिच्यासोबत झालेल्या या फसवणूकीविषयी सांगितले. त्यानंतर लगेच आकांक्षानं तिचं अकाऊंट ब्लॉक केलं. दरम्यान, तो पर्यंत तिच्या अकाऊंटमधून 30 हजार रुपये काढण्यात आले होते. आकांक्षाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की तिच्या मेहनतीची कमाई काही कारण नसताना तिच्या अकाऊंटमधून पैसे गेले.