Alia Bhatt Pregnant Second Time : अभिनेत्री आलिया भट्टने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर दुसरीकडे तिचा पती रणबीर कपूरही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. आलिया आणि रणबीरने बॉलिवूडला आत्तापर्यंत सुपरहिट सिनेमा दिले आहेत. दोघांचे बऱ्यापैंकी सिनेमा आत्तापर्यंत हिटच झाले आहेत. नुकतीच या कपलने आपल्या लग्नाची पहिली एनिव्हरर्सरी साजरी केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर आलियाने लगेजच आपल्या प्रेंग्नंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या बातमीने अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर अनेकांनी मात्र तिला जबरदस्त ट्रोल केलं. लग्नाआधीच अभिनेत्री प्रेग्नंट असल्यांच अनेकजण म्हणणं होतं. मात्र आलिया-रणबीरने यावर कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. नोव्हेंबरमध्ये आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या गोड मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.


मात्र आता आलियाबाबत अजून एक बातमी समोर येत आहे. जे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होवू शकतात. सोशल मीडियावर पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याची बातमी (Alia Bhatt Not Pregnant Second Time) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 
 
पण आम्ही तुम्हाला या बातमीमागचं सत्य सांगणार आहोत. गेले काही दिवसांपासून आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. अभिनेत्रीचा एक बेबी बंप फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे. जरी हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असेल तरी, हा फोटो पुर्णपणे बनावट आहे. कारण हा फोटो आत्ताचा नाही तर तिच्या पहिल्या प्रेग्नंसीवेळचा आहे. 
 
आलियाच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती. यावेळी आलिया किंवा रणबीर दोघांनीही कोणतही स्पष्टीकरण दिलं नाही. वास्तविक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो जुने आणि पूर्णपणे बनावट फोटो आहेत. याआधी अशा अफवांच्या अनेक अभिनेत्री बळी पडल्या आहेत. यामध्ये काजोल, ऐश्वर्या, करिना अशा अनेक अभिनेत्रींचा सामावेश आहे.