मुंबई : झगमगत्या विश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कायम चर्चेत राहतील. आपल्या अभिनयाने, शैलीने आणि आवाजाने सर्वांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते देव आनंद (Anand Dev) यांनी त्याकाळी सर्वांच्या मनावर राज्य केलं. देव आनंद यांचा जन्म 1923 मध्ये पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये झाला होता. देव आनंद अशा बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहेत, ज्यांची चर्चा आजही रंगलेली असते. याचं कारण म्हणजे त्यांच्याशी संबंधित किस्से आजही चर्चेत आहेत.  त्यामधील एक म्हणजे त्यांचा काळा कोट.  (dev anand black suit quora)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देव आनंद यांनी काळा कोट घातल्यानंतर अनेक मुली त्यांच्यावर फिदा व्हायच्या. देव आनंद यांच्या प्रेमात मुली इतक्या वेड्या होत्या की अनेक मुलींनी आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलं.  (dev anand movies)



देव आनंद यांनी त्यांच्या काळात पांढरा शर्ट आणि काळा कोट खूप लोकप्रिय केला होता. एवढंच नाही तर, अनेकांनी त्यांचा लूक देखील कॉपी केला. एक काळ होता जेव्हा देव आनंद यांनी काळ्या कोटचा ट्रेंड सुरू केला होता. (The black coat trend)


तेव्हा अशा काही घटना घडल्या की चक्क कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक ठिकाणी काळ्या रंगाचा कोट घालण्यास न्यायालयाने बंदी घातली. असं म्हणतात की, जेव्हा मुली त्यांना काळ्या कोटात पाहायच्या, तेव्हा देव आनंद यांच्यावर फिदा व्हायच्या. 


एवढंच नाही तर, काही मुलींनी आत्महत्या देखील केली. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा न्यायालयाने त्यांना काळा कोट घालण्यास बंदी घातली. देव आनंद यांच्या आयुष्यातील हा किस्सा प्रचंड प्रसिद्ध आहे.