मुंबई : अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर जास्त अॅक्टीव्ह असलेले दिसतात. शूटींग किंवा खाता-फिरतानाचे व्हिडिओ, फोटोस ते आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असतात. त्यांचे लाखो चाहते यावर लाईक्स, कमेंट आणि शेअर करत असतात. सेलिब्रिटीही आपल्या चाहत्यांना इथे उत्तर देत असतात. स्पोर्ट्स अॅंकरिंग आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली अर्चना विजया सध्या आपल्या फ्रेंण्ड्ससोबत सुट्टी एन्जॉय करतेय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने आपल्या व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेयत.



या फोटोसमध्ये ती हॉट अंदाजात दिसतेय. अर्चनाने क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलला होस्ट केलं होतं.



यासोबतच ती अॅवॉर्ड शोमध्येही दिसली होती. अर्चना एक स्पोर्ट अॅंकरसोबतच सुपर मॉडेलही आहे.



तिने आपले करियर चॅनल व्ही च्या सुपरमॉडेल शो 'Get Gorgeous'पासून सुरू केले.



अर्चनाने हा शो जिंकलादेखील होता. शो जिंकल्यानंतर अर्चनाने 'Get Gorgeous'चा पुढचा सिझन होस्टदेखील केला होता.



रिअॅलिटी शोमध्ये यश मिळवल्यानंतर तिला मॉडेलिंगच्या ऑफर आल्या.



तिने 'रोम फॅशन वीक'मध्ये हिस्सा घेतला. यानिमित्ताने ती मिलान, सिंगापुर आणि फ्रान्सला जाऊन आली.