Simran Gupta: सध्या सेलिब्रेटी कायमच ग्लॅमरच्या विश्वात (Celebs) वावरत असतात. तेव्हा आपल्याला हेही माहितीच आहे सेलिब्रेटींसाठी तिची ग्लॅमरस (Glamours Life) लाईफही तितकीच महत्त्वाची आहे. परंतु आता आपल्यासमोर अशीही काही उदाहरणं येत आहेत जी पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की या सेलिब्रेटींनी काम आणि ग्लॅमरस लाईफ सोडून वेगळा प्रवास का स्विकारला ते. त्यातील अशीच एक अभिनेत्री आहे जिनं ग्लॅमरस लाईफपासून दूर जात चहाचा स्टॉल टाकण्याचा विचार केला आहे. (actress and model sonam gupta now sells tea in a stall and serves customers leaving glamour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरखपूर येथील रहिवासी सिमरन गुप्ता (Simran Gupta) हिनं आपलं ग्लॅमरस लाईफ सोडून सरळ चहाचा स्टॉल टाकून पोटापाण्याचा विचार केला आहे. सिमरनने मिस गोरखपूरचा (Gorakhpur) किताब पटकावला आहे. तिनं अनेक जाहिरातींमध्येही काम केले. मात्र कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती सध्या चहाचा स्टॉल लावत आहे. ती आता हे काम पूर्ण झोकून आणि मेहनतीने करते आहे. तिला खात्री आहे की एक दिवस ती याच कामातून मोठं नावं काढेल. 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


गोरखपूरमध्ये रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणारी ही मुलगी पाहून तुम्हाला वाटणार नाही की ती चार वर्षांपूर्वी सेलिब्रिटी होती. 2018 मध्ये सिमरन गुप्ताच्या डोक्यावर मिस गोरखपूरचा (Miss Gorakhpur) ताज चढला होता. त्यानंतर ती नव्या पिढीसाठी आदर्श ठरली. सिमरन अजूनही रोल मॉडेल आहे. आपल्या अपंग भावावर उपचार करता यावेत म्हणून ती मॉडेल चायवाली या नावाने स्वतःचा चहाचा स्टॉल (Tea Stall Near Me) चालवते.


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य 


संघर्ष आणि अतूट धैर्याच्या बळावर आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्याच्या आवेशाचं उदाहरण म्हणजे सिमरन आहे. सिमरन ही गोरखपूरमधील सूर्यकुंडची रहिवासी आहे. वडील राजेंद्रकुमार गुप्ता खासगी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवतात. सिमरनचा भाऊ दिव्यांग आहे. ग्रॅज्युएशननंतर सिमरन गुप्ताने (Beauty Pageant) मिस गोरखपूर स्पर्धेत भाग घेतला आणि तिने हा किताब पटकावला. यानंतर तिला तिच्या करिअरमध्ये एक नवा मार्ग सापडला., सिमरनने अनेक जाहिरातींमध्येही काम केले. पण नंतर करोना आल्यानं सगळ्यावरच पाणी पडलं. 



तिला मॉडेलिंगचे काम मिळणे बंद झाले. भावाच्या आजारपणामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने घरही विकले गेले. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहू लागले. सिमरननेही एका ठिकाणी करारावर नोकरी केली, पण अनेक महिने पगार मिळाला नाही. यानंतर सिमरनने चहाचे स्टॉल लावायला सुरुवात केली.


सकाळपासून संध्याकाळपर्यंत सिमरन दररोज सुमारे 250-300 कप चहा विकते. या पैशातून ती तिच्या अपंग भावावर उपचार करते. कुटुंबाला मदत करते. सिमरन म्हणते की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कोणतेही काम झोकून देऊन आणि मेहनतीने केले तर यश प्राप्त होते. आता लवकरच सिमरन मॉडेलिंगच्या विश्वात परतण्याची शक्यता आहे.