मुंबई : आजकाल अंजली अरोरा (Anjali Arora) सतत चर्चेत असते. खरंतर, अभिनेत्रीचा एमएमएस  (MMS) लिक झाला होता. ज्यामुळे ती सतत चर्चेचा विषय बनली होती. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर अंजलीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यूजर्स अंजलीला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, पुन्हा एकदा अंजली लोकांच्या निशाण्यावर आली आहे. त्याचवेळी पुन्हा एकदा अंजली चर्चेचा विषय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे
वास्तविक, अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजलीने व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. एकीकडे हा व्हिडिओ अनेकजण लाइक करत आहेत.


दुसरीकडे लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल करताना एका युजर्सने लिहिलं आहे की, 'तुमचे पैसे कमवण्याचा दुसरी मार्ग पहा, कारण या उद्योगात तुमचं भविष्य नाही. दुसर्‍याने लिहिलं, यापेक्षा लहान ड्रेस घातला असता.  अंजलीचं हे नवीन गाणं शाहरुखच्या 'जोश' चित्रपटातील 'मेरे ख्यालों की मलिका' या गाण्याचं रिमेक व्हर्जन आहे.


जरी अभिनेत्री तिच्या जबरदस्त डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत असे, परंतु आजकाल अभिनेत्री एमएमएसमुळे सतत चर्चेत आहे. एमएमएस समोर आल्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी आपण नसल्याचं सांगत ती रडली होती. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्येही दिसली
अंजली अरोरा एमएमएस स्कँडलपूर्वी सोशल मीडियावर तिच्या हॉट डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत होती. याशिवाय अंजलीला तिच्या लव्ह हेट इमेजमुळे अभिनेत्री कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्येही बोलावण्यात आलं होतं. ईथे तिने सह-स्पर्धक मुनावर फारुकीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते.