मुंबई : कोरोना महामारीनंतर वेब सिरीजचा ट्रेंड वाढला आहे. लोक आता थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरी बसून चित्रपट पाहणे पसंत करतात. पण वेब सीरीजचा ट्रेंड वाढत असताना त्यात आता बोल्ड कंटेंट ही मोठ्या प्रमाणात यायला लागला आहे. पण या कंटेंटला मोठा प्रेक्षकवर्गही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी बोल्ड वेब सीरीज करत चाहत्यांना धक्का दिला आहे. यामध्ये आता अनुपमा प्रकाशचं नाव देखील जुडलं आहे. इंटिमेट सीन्स देत अनुपमा प्रकाश आता चाहत्यांना धक्का देणार आहे. ती पहिल्यांदा 'रिस्कनामा' चित्रपटात पाहायला मिळाली होती. नंतर ती उल्लू अॅपच्या 'रिथी रिवाज तिजारत' या वेब सीरीजमध्ये दिसली होती.


'लव्हली मसाज पार्लर'मुळे ती खूप चर्चेत होती. या वेब सीरिजमध्ये तिने खूपच हॉट सीन्स दिले आहेत. अनुपमा प्रकाशने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे पण या वेब सीरिजने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.


'लव्हली मसाज पार्लर' ही वेबसीरीज एका अशा मुलीची कथा आहे जिचे वडील नसतात आणि आई आजारी असते. तिचा भाऊही काही कमावत नाही. अशा परिस्थितीत तिला घरखर्च आणि आईच्या उपचाराची व्यवस्था करावी लागते. ती तिच्या एका मैत्रिणीशी नोकरीसाठी बोलते आणि नंतर पार्लरमध्ये मसाज गर्ल म्हणून काम करते.