मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडियानं जग जवळ आणलं, तरीही याचे तोटेही दिसून आले. काही नावाजलेल्या मंडळींना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं. (Social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातलंच एक नाव होतं, अभिनेत्री अपर्णा दीक्षित हिचं. अपर्णानं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाटा फोडत कोणा एका व्यक्तीनं सेक्शुअल फेवर मागितल्याचा धक्कादायक खुलासाही केला. (Cyber Crime)


2021 मध्ये तक्रार करत तिनं आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं. तक्रारीमध्ये तिनं काही गोष्टी नमुद केल्या. ज्यामध्ये अकाऊंट हॅक होणं आणि त्यावरून पॉर्न शेअर केल्या गेल्याचा धक्कादायक खुलासा केला. 


आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये असणाऱ्या अनेकांनाच सेक्शुअल कंटेंट पाठवला गेल्याचंही तिनं सांगितलं. सदर प्रकरणामुळं माझील प्रतीमा मलिन झाल्याचं म्हणत अपर्णानं पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली. 


इथं मोठी बाब अशी, की हॅकर्सनी तिला तिच्याच पेजवरून बॅन केलं होतं. ज्यामुळं ती यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करु शकत नव्हती. 



सदर तक्रारीनंतर पोलिसांनी फेसबुक टीमच्या साथीनं अपर्णाला तिच्या अकाऊंटचे हक्क परत दिले. सोबतच पाठवलेला पॉर्न कंटेंटही डिलीट केला. 


अभिनेत्रीसोबत घडलेला हा प्रकार दिला मोठा हादरा देऊन गेला. सोबतच सोशल मीडियाची घातक बाजूही दाखवून गेला हेसुद्धा तितकंच खरं.