मुंबई : छोट्या पडद्यावरील आयशा कपूर (Ayesha Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. आयशानं 'शेरदील शेरगिल' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील आयशाची निक्की ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेत धीरज धूपर अशी एक भूमिका आहे त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका आयशानं साकारली आहे. दरम्यान, अशा चर्चा सुरु आहेत की आयशाच्या भूमिकेत काही बदल होणार आहेत. सुरभी चंदना आणि धीरज धूपर यांच्या स्टोरीतही बदल होणार आहेत. मात्र, आयशानं इंडस्ट्रीतील तिच्या संघर्षाविषयी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयशानं खुलासा केला की, जेव्हा ती छोट्यापडद्यावर पदार्पण करण्यासाठी संघर्ष करत होती, तेव्हा निर्माते तिच्याकडून कोणत्या प्रकारच्या मागण्या करत होते. एकाने तर तिला म्हटलं की तिला तिच्या छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी त्याच्याशी लग्न करावं लागेल, तरच ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकेल असं आयशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 


वाचा काय म्हणाली आयशा कपूर -


आयशानं नुकतीच 'स्पॉटबॉय'ला मुलाखत दिली होती. यावेळी आयशा म्हणाली, 'मला सुरुवातीपासून एक कलाकार व्हायचं होतं. माझा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला मी लोकांना भेटायचे तेव्हा ते माझी खूप दिशाभूल करायचे. लोक सांगायचे आणि मी त्यांच्या बोलण्यात गुंतून जायचे.जेव्हा कधी ऑडिशनला जायचे तेव्हा खूप गोंधळात पडायचे. पुढे त्या खोट्या लोकांपासून मी सुटका करून घेतली आणि मार्ग शोधला. वेब सिरीजमध्ये मला काही चांगल्या भूमिकांच्या ऑफर मिळाल्या. पण मला टीव्ही शो करायचे होते. वेब सिरीजमध्ये काम केल्यावर मला कुठेतरी टीव्ही शो मिळाले.'



आयशा म्हणाली, 'मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. त्यात मी मुख्य भूमिकेत दिसणार होते. पण शोच्या निर्मात्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली. ते म्हणाला की, जर मी त्यांच्याशी लग्न केले तरच मला हा शो मिळेल. मी शोचे शूटिंगही सुरू केले होते, पण नंतर जेव्हा मी या निर्मात्यांकडे डील मान्य केली नाही तेव्हा त्यांनी मला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. मी जितके दिवस काम केले त्या दिवसांचा पगारही दिला नाही. हसले आणि म्हणाला की तो मला मुंबईत आलिशान जीवन आणि आरामदायी जीवन देईल. म्हणजे प्रसिद्धी आणि पैसा मला कष्टाशिवाय मिळेल. मला फक्त त्याच्याशी लग्न करायचे होते. मी शॉर्टकट न घेण्याचे ठरवले आणि त्याला नाही सांगितले.' (actress ayesha kapoor reveals she was asked to marry producer for tv debut know details) 


हेही वाचा : जया बच्चन यांचं नाव घेताच बिग बींनी व्यक्त केली मनातील भीती


आयशाने सांगितले की, तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा नातेवाईकांनी तिच्याशी बोलणं बंद केले कारण ती अभिनयाच्या जगात तिचं नशिब आजमावणार होती. आज तेच नातेवाईक तिच्यासोबत फोटो काढायला आणि तिला त्यांच्या घरी जेवायला बोलवायलाही उत्सुक आहेत. शेवटी हे कसले दुहेरी चेहऱ्याचे जग आहे, असा सवाल आयेशानं यावेळी केला. एखाद्या अभिनेत्यानं आपल्या कामात पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो, असा विश्वास आयशानं व्यक्त केला. आयेशा कपूर वेब सीरिजसोबतच अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसते.