मुंबई : कलाकार आणि त्यांच्या खासगी जीवनात असणारे किस्से चर्चांच्या वर्तुळात कायमच असतात. मुलात सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात ज्यामुळं या चर्चा आणि किस्स्यांना आणखी वाव मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक किस्सा सद्या कमालीचा गाजतोय. निमित्त ठरत आहे ते म्हणजे सलमानसोबत ऑनस्क्रीन प्रेमाची स्वप्न रंगवणारी अभिनेत्री भाग्यश्री आणि तिच्या पतीचं वैवाहिक नातं. 


'मैने प्यार किया' या एका चित्रपटामुळे चर्चेच असणारी भाग्यश्री (Bhagyashree) आणि तिचा पती, हिमालय दासानी (Himalay Dassani) हे दोघंही सध्या एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. 


शोमध्ये या जोडीनं त्यांच्या लग्नाविषयी, या नात्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडाही केला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दलही या जोडीनं एक मजेशीर खुलासा केला आहे.


लक्ष देण्याजोगी बाब अशी, की हिमालयनं जेव्हा भाग्यश्रीसोबतच्या त्या रात्रीचा किस्सा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वांचेच कान टवकारले. पण, नेमका किस्सा समोर आला आणि मग.... 


काय म्हणाला हिमालय? 
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगताना हिमालयनं आपण खोलीत जातानाच नव्या नवरीला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. खोलीमध्ये जाऊन तिच्या डोक्यावर असणारा घुंघट उचलण्याची अपेक्षा करत होता. 




पण, झालं एकदम उलट... कारण हिमालय खोलीत गेला आणि तिथे भाग्यश्री स्लीपवेअर अर्थात झोपायच्या वेळी घालतात अशा कपड्यांमध्ये होती. 'हॅलो बेब्स..' असं म्हणत तिनं पतीचं स्वागत केलं जे पाहून तोही भांबावला. 


भाग्यश्रीनं लगेचच पतीला, मला झोप आल्याचं सांगत ती झोपीसुद्धा गेली.


हा किस्सा खुद्द भाग्यश्री आणि हिमालय या दोघांनाही कायमचा लक्षात 
ठेवत जीवनाची अतिशय आनंददायी सुरुवात केली.