Actress Cries Over Tomato Prices: देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने पेट्रोलच्या दरालाही मागे टाकलं आहे. बऱ्याच शहरांमध्ये एक किलो टोमॅटोसाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही भरमसाठ वाढले आहेत. आलं, मिर्च्या, कोथिंबीर यासारख्या रोजच्या आहारातील गोष्टींचे दरही गगनाला भिडले आहेत. सर्वासामान्यांना याचा मोठा फटका बसत असतानाच टोमॅटोचे वाढलेले दर पाहून परदेशातून परलेली अभिनेत्री राखी सावंतने तर पत्राकरांसमोर डोकं फोडून घ्यावसं वाटतंय असं म्हटलं आहे.


"टोमॅटोचे दर पाहून असं वाटतं की..."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंत कालच श्रीलंकेवरुन मुंबईत परतली. मागील काही दिवसांपासून राखी श्रीलंकेत भटकंतीसाठी गेले होती. भारतात परत आल्यानंतर मुंबईत काही पॅपराझींनी राखी सावंतची मुलाखत घेतली. एका लॉबीमध्येच चालता चालता राखीने पॅपाराझींशी संवाद साधला. यावेळी भिंतीवर डोकं आपटण्याचा अभिनय करत राखीने, "मी फार अपसेट आहे. डोक फोडून घ्यायची इच्छा आहे. बटाटे, टोमॅटो, कांदे फार महाग झालेत" असं म्हटलं. राखीचं हे विधान ऐकून पॅपराझींनाही हसू आलं. त्यानंतर या पॅपराझींनी राखीला कांदा, टोमॅटोचे भाव सांगतानाच मिर्चीही फार महाग झाल्याचं सांगितलं. हे ऐकून राखीने, "स्वत: शेत घेऊन गरजेपुरते टोमॅटो आणि मिर्चांचं उत्पादन घ्यावं असा विचार करत आहे," असं म्हटलं. "मी शेत घेईल तेव्हा त्यात नांगर तुम्ही चालवा," अशी अजब ऑफरही तिने या पॅपाराझींना दिली.


"मी टोमॅटो डाएटवर आहे"


पुढे बोलताना राखीने, "मी सध्या टोमॅटो टाइटवर आहे. मी ऐकलं आहे की केवळ टोमॅटो खाल्ले तर टोमॅटो सारखे दिसू, हे खरं आहे का?" असा प्रश्न पॅपराझींना विचारला. त्यावर एका पॅपराझींने आता तर तुम्ही म्हणालात की टोमॅटो महाग झालेत, असं म्हटल्याची आठवण राखीला करुन दिली. त्यावर अन्य एकाने, 'अरे राखीजींकडे फार पैसे आहेत' असं म्हटलं. त्यावर राखीनेच त्या व्यक्तीला, "कोणते पैसे?" असा प्रश्न विचारला. नंतर पुढे बोलताना राखीने, "मी श्रीलंकेला जाऊन आले म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत असं नाही. मी पायलेटला पैसे दिले कारण त्याने माझा जीव वाचवला," असंही सांगितलं.



राजकीय आरोप प्रत्यारोप


दरम्यान, भाज्यांच्या वाढलेल्या दरांवरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ठाकरे गटाने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 2014 ला महागाईच्या मुद्द्यावरुन सत्तेत आल्यानंतर काही विशेष फरक पडला नाही असं ठाकरेंनी म्हटलं आहे. जर तुम्हाला महागाईचा दर नियंत्रणात आणता येत नसेल तर मागील 9 वर्षांमध्ये सत्तेत येऊन तुमचा जनतेला काय उपयोग झाला? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.