Entertainment News : कलाविश्वाचा कितीही हेवा वाटला तरीही या कलाजगतामध्ये प्रत्यक्षात काम करणाऱ्यांच्या जीवनात डोकावून पाहिल्यासच नेमकी परिस्थिती लक्षात येते. प्रेक्षकांच्या मनावर जवळपास दशकभराहून अधिक काळापासून राज्य करणाऱ्या अभिनेत्रीचंही असंच आहे. सुरुवातीच्या काळात या कलाजगतामध्ये संघर्ष करून त्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीनं सुरुवातीच्या दिवसांमध्ये एका किरकोळशा घरात भाडेतत्वाव आसरा घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑडिशन आणि आवडीच्या भूमिकेसाठीची तिची वणवण सुरूच होती. इथं करिअरच्या संघर्षामध्ये यशाच्या शोधात असणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या खासगी आयुष्यातही बऱ्याच अडचणींचा सामना केला, पण तिचा संघर्ष संपण्याचं नावच घेचत नव्हता, पण तिनं धीर गमावला नाही. या अभिनेत्रीचं नाव आहे, दिपीका कक्कर. आजच्या घडीला चाहत्यांसमोर दिपीकाच्या सुखी वैवाहिक आयुष्याची झलक येत असली तरीही तिच्या जीवनातील आव्हानात्मक काळ विसरून चालणार नाही. 


विभक्त कुटुंब... 


बालपणीपासूनच काहीशा विचित्र परिस्थितीला दीपिका सामोरी गेली. ती लहान असतानात तिच्या आईवडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच तिला विखुरलेल्या नात्यांचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत खुद्द दीपीकानंच म्हटल्यानुसार तिच्या जीवनातील एकत्र कुटुंबाची कमतरता पती, शोएबच्या कुटुंबानं भरून काढली. 


प्रेमाच्या बाबतीतही दिपीकाला संघर्ष चुकला नाही. शोएबशी लग्न करण्याआधी तिनं रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. त्यावेळी दीपिका एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती. 2013 मध्ये दिपीका आणि रौनकनं वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. पण, त्यांचं हे नातं फार काळ टीकू शकलं नाही. लग्नानंतर दोन वर्षांतच नात्याला तडा गेला आणि या जोडीच्या वाटा वेगळ्या झाल्या. एका मुलाखतीदरम्यान दिपीकानं आपण पहिल्या लग्नामध्ये आनंदात नव्हतो असं म्हणत या नात्यात आपला मानसिक छळ झाल्याची बाब तिनं बोलून दाखवली होती. 


हेसुद्धा वाचा : 'Kalki 2898 AD पाहणं माझ्यासाठी अवघड!' भावूक रणवीर म्हणाला, 'ती खरोखर गरोदर..'


 



'ससुराल सिमर का' या मालिकेनं दीपिकाच्या जीवनाला नवी कलाटणी दिली. जिथं करिअरमध्ये यशही संपादन करण्याची संधी तिला मिळाली आणि याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दिपीकासमवेत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेता शोएब इब्राहिम याच्यावर तिचं प्रेम जडलं. सुरुवातीची मैत्री आणि त्यानंतरच्या प्रेमाच्या नात्याला या दोघांनीही निकाह करत नवी ओळख दिली. अशी ही जोडी आता रुहान नावाच्या एका गोंडस मुलाचे पालक असून, त्यांच्या कुटुंबाचा त्रिकोण खऱ्या अर्थानं पूर्ण झाला, अशीच प्रतिक्रिया देताना दिसते.