Actress Slap Producer: आधी ड्रिंक्ससाठी जबरदस्ती नंतर साडी सोडायला सांगितली... अभिनेत्रीने लगावली कानशिलात!
Actress Slap Producer In Party: या अभिनेत्रीच्या एका चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्येच हा संपूर्ण प्रकार घडला. यानंतर ही अभिनेत्री पार्टी सोडून निघून गेली.
Actress Farah Naaz: बॉलिवूडचे अनेक किस्से आणि कथा लोकप्रिय आहेत. त्यातही 80 आणि 90 च्या दशकामधील किस्स्यांवरुन आजही चर्चा रंगतात. अगदी बातम्यांपासून ते थ्रो बॅक फोटो आणि व्हायरल पोस्टमधून हे किस्से व्हायरल होत असतात. या कालावधीमध्ये अनेक प्रसिद्ध नट आणि नट्या होऊ गेल्या. याच नट्यांपैकी एक म्हणजे फराह नाज (Farah Naaz). अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फराह नाज यांनी काम केलं. फराह नाज या त्यांच्या रोकठोक मतांसाठी ओळखल्या जायच्या. एकदा तर त्यांनी भर पार्टीमध्ये एका प्रसिद्ध निर्मात्याच्या कानाखाली मारली होती. नेमकं काय घडलं होतं. काय झालं हे आपण जाणून घेऊयात...
कधी घडला हा प्रकार?
फराह नाज यांनी नावाजलेल्या या निर्मात्याला सर्वांसमोर कानाखाली मारण्याचं कारण ठरलं त्याने फराह नाज यांना दिलेली वागणूक. हा संपूर्ण किस्सा 1988 साली घडला. याच वर्षी प्रदर्शित झालेली फराह नाज यांचा 'यतीम' नावाचा चित्रपट तुफान गाजला होता. याच चित्रपटाच्या यशानंतर एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्येच हा प्रकार घडला.
नेमकं घडलं काय?
या पार्टीला त्यावेळेचे नावाजलेले अनेक कलाकार आणि मनोरंजन सृष्टीशी संबंधित व्यक्ती उपस्थित होते. यात नावाजलेले चित्रपट निर्माते फारुख नाडियाडवालाही उपस्थित होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फारुख यांनी ड्रिंक्स केल्याने त्यांना परिस्थितीचं भान राहिलं नाही. त्यांनी नशेतच फराह नाज यांना ड्रिंक्स घेण्याचा आग्रह केला. फराह नाज यांनी अनेकदा नकार दिला. मात्र त्यानंतरही फारुख हे नाज यांनी ड्रिंक करावं असा आग्रह धरुन होते. फराह नाज यांनी वारंवार नकार दिल्याने त्या आपला अपमान करत आहेत असं फारुख यांना वाटू लागले. त्यामुळे संतापून फारुख यांच्या तोंडून असं काही निघून गेलं की फराह नाज या रागाने लालबुंद झाल्या आणि त्यांनी फारुख यांच्या थेट कानशिलात लगावली.
फारुख काय म्हणाले होते?
असं म्हटलं जातं की त्यादिवशी नशेत फारुख यांनी, "साडीमुळे ड्रिंक करत नसशील तर साडी सोड," असं फराह नाज यांना म्हटलं. हे ऐकून फराह नाज यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी पुढचा मागचा विचार न करता निर्माते फारुख यांच्या कनाशिलात लगावली. यानंतर फराह नाज त्या पार्टीमधून निघून गेल्या. या पार्टीला उपस्थित अससेल्या काही पत्रकारांसमोरच हा प्रकार घडल्याने दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भातील बातम्या छापून आल्या आणि या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.
फारह यांनी दिलेलं स्पष्टीकरण
यानंतर फराह नाज यांनी फारुख यांना कानाखाली मारली नव्हती असं सांगितलं होतं. मात्र त्याचवेळी फराह नाज यांनी आपण फारुख यांच्या आग्रहाला अनेकदा विरोध केला होता हे ही सांगितलं. फारह या काही वर्षांपूर्वी करिना कपूर आणि अक्षय खन्ना यांची प्रमूख भूमिका असलेल्या 'हलचल' चित्रपटामध्ये झळकल्या होत्या.