मुंबई : सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे 'बिग बॉस 17'ची, अनेकदा यामधील कपल्स चांगल्या कारणामुळे चर्चेत असतात. तर कधी यामधील कपल खूप जोरदार भांडण करताना दिसतात. मात्र सध्या हा शो एका एक्स कपलमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये सध्या एक्स कपल सहभागी झालं आहे. अनेकदा हे कपल एकमेकांची बदनामी करताना दिसतात. नुकताच या दोघांमध्ये इतका वाद झाला की त्यांना कल्पनाही नव्हती की ते रागाच्या भरात काय काय बोलून गेले.  इशा आणि अभिषेक यांनी एकमेकांच्या सर्वात वाईट बाजू सर्वांसमोर आणल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांच भांडण खूप टोकाला गेलं. बोलताना या दोघांमध्ये अजिबातच भान नव्हतं की ते नक्की दोघं काय बोलत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, अभिषेक ईशावर जोरात ओरडताना दिसत आहे. ईशा मालवीयानेही तिचा भूतकाळ समोर आणायला सुरुवात केली. तिच्या टॉक्सिक रिलेशनशिबद्दलही तिने बोलायला सुरुवात केली. टॉक्सिक रिलेशनशिप ते  वन-नाइट स्टँडबद्दल बोलून एकमेकांच्या पात्रांना खाली आणण्यापर्यंत एवढंच नव्हेतर ब्युटी इंजेक्शन घेण्याबद्दल बोलून या दोघांनी एकमेकांना खाली आणण्यापर्यंत, ज्या वैयक्तिक गोष्टी यावेळी सगळ्यांसमोर सांगितल्या. इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांनी गेममधील प्रत्येक मर्यादा ओलांडली नंतर, आम्ही अभिषेकने ईशाची छेड काढली जेव्हा ती तिचे अंतर राखत होती. ईशाने काही भयानक गोष्टीही सांगितल्या.  


जेव्हा इशा मालविया अभिषेकसोबत भांडत होती तेव्हा समर्थ जुरेल ईशाची बाजू घेत होता. तो तिला वाचवत होता. मात्र अभिषेकवर अनेक अपमानजनक कमेंटही तो करत होता. तिने अभिषेकला हे सांगून अपमानित केलं की, कोणीच त्याच्या सोबत राहू ईच्छित नव्हतं. एवढंच नव्हेतर त्याच्या आई-बाबांनाही त्याची लाज वाटते. ईशाने अभिषेकवर तिचे शरीर तयार करण्यासाठी स्टेरॉईड्स घेतल्याचा आरोप केला, तर अभिषेकने ब्युटी इंजेक्‍शन घेतल्याबद्दल ईशाला बोलण्यास सुरुवात केली. 9000 रुपयांचं इंजेक्शन घेते असं बोलत अभिषेकने तिला ट्रोल केलं. एवढंच नव्हेतर वन नाईट स्टँडही करते असं अभिनेत्याने यावेळी म्हटलं, दोघांनीही या भांडणात त्यांच्या सगळ्या मर्यादा ओलांडली.  


येवढंच नव्हेतर तिच्या इजेक्शनचे बिल्स मी भरायचो असंही यावेळी अभिनेता म्हणाला. यावेळी बोलताना तो म्हणाला ही सुंदर दिसण्यासाठी 9 हजारचे इंजेक्शन घ्यायची ज्याचे मी बिल भरले आहेत. तर अभिनेत्री म्हणाली तो स्टेरॉईड  घेवून घेवून चिडचिडा झाला आहे. याचबरोबर तो मुलीसोबत गाडीत खूप वाईट कृत्य करायचा असंही अभिनेत्री म्हणाली.