मुंबई : सध्या अनेक ठिकाणी सरोगेट मदरची क्रेझ आहे. अनेक अभिनेत्री सरोगसीद्वारे आई होण्याला प्राधान्य देत आहे. आता याच सगळ्या चर्चांदरम्यान एक अजब बातमी येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्या मैत्रिणीला एक अजब सल्ला दिला आहे. या अभिनेत्रीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर गुडविनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिने आपल्या खास मैत्रिणीला आपल्या पतीच्या स्पर्मबाबत ऑफर दिली होती. या अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार पतीचा स्पर्म घेऊन गर्भवती होण्याचा सल्ला तिने दिला होता. जेनिफर 43 वर्षांची आहे आणि तिचा पती देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. 


अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलेल्या दाव्यानुसार तिची खास मैत्रीण सिंगल आहे. तिचं लग्न झालं नाही. मात्र तिला आई होण्याची इच्छा आहे. तिच्या इच्छेचा मान ठेवून आणि ही इच्छा पूर्ण कऱण्यासाठी अभिनेत्रीने आपल्या पतीचा स्पर्म घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जगभरात स्पर्म डोनेशन आणि आयवीएफद्वारे आई होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर मनोरंजन विश्वात सरोगसीद्वारे आई होण्याकडे कल अधिक आहे. 


अभिनेत्रीने दिलेल्या ऑफरवर ना तिची खास मैत्रीण तयार झाली ना तिचा पती. तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार भविष्यात यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या होऊ नयेत यासाठी आधीच पतीने नकार दिला. याबाबत देखील तिने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 


अभिनेत्रीला आपल्या खास मैत्रिणीची इच्छा पूर्ण करायची होती. मात्र जेनिफरची ही ऑफर पतीनेच नाकारली. तिने आपल्या पतीला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो आपल्या निर्णयावर ठाम असल्याने आता अभिनेत्रीचं हे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.