Ishita Dutta and Vatsal Seth Baby Name: सध्या अनेक लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते यांनी सोशल मीडियावरून गुड न्यूज द्यायला सुरूवात केली आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय कपलनं चाहत्यांना गुडन्युज दिलेली असून त्यांनी गोंडस अशा मुलाला जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे अभिनेता वत्सल शेठ आणि इशिता दत्त यांची. अभिनेत्री इशिता दत्ता हिनं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केल्यानंतर तिचे प्रेग्नंन्सी शूट हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावरूनही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 19 जूलैला त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे त्यांच्या या बातमीनंतर त्यांच्या फॅन्समध्ये त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. नुकतेच त्यांच्या लेकाचे नामकरण झाले असून त्याच्या नावानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. त्यांच्या लेकाच्या नावाचे हनुमानाशी खास कनेक्शन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचसोबत आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेआधी त्यांनी एक नवं घरंही घेतले होते. इशितानं आपल्या आणि वत्सलच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओही व्हायरल केला होता. त्यांनी 28 नोव्हेंबर 2017 रोजी इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती परंतु त्यांनी कुठलाच गाजावाजा न करता गुपचूप लग्न उरकले होते. त्यांनी एकत्र टीव्ही शो केला होता. 'रिश्तों का सौदागर - बाजीगर' या मालिकेतून त्यांनी एकत्र काम केले होते. त्यांची पहिल्यांदा तिथे भेट झाली होती आणि त्यांनी त्यानंतर एकमेकांना प्रपोज केले आणि मग लग्न केले. 


हेही वाचा - 'कोण आहे ही पोरगी..?' पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा...; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी


इशिता हिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या बाळाच्या नामकरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पारंपारिक पद्धतीनं नामकरण सोहळा झालेला पाहायला मिळाला. त्यांच्या नव्या बाळाला पाळण्यात पाहून तुम्हालाही त्यांच्या गोंडसपणाचा प्रत्यय येईल. यावेळी कुटुंबियांनी 'होली जोडी पीपल गान' हे गाणंही गायले. सोबतच या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स दिले आहेत. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, बाळाचे नावं हे 'वायु' असं ठेवलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर प्रेमाचा पाऊस पाडला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री-अभिनेत्रींमध्ये चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या गुडन्यूजची. काही दिवसांपुर्वी दिपिका कक्कर हिला मुलगा झाला आहे. सोबतच राहुल वैद्य आणि दिशा परमार हे देखील लवकरच गुडन्यूज देणार आहेत.