'कोण आहे ही पोरगी..?' पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा...; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी

Vandana Gupte Love Story: वंदना गुप्ते या आपल्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 11, 2023, 03:35 PM IST
'कोण आहे ही पोरगी..?' पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा...; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी title=
August 11, 2023 | vandana gupte shares love story when her husband first saw her in show khupte tithe gupte

Vandana Gupte Love Story: अभिनेत्री वंदना गुप्ते यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावर्षी 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच सुपरहीट झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. त्यातून वंदना गुप्ते यांच्या अभिनयानंही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन प्रत्येक मराठी मनाला भुरळ घालणारे आहे. यावेळीही त्यांच्या वेगळ्या दिग्दर्शन कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं अक्षरक्ष: 'सैराट' आणि 'वेड' या दोन्ही चित्रपटांनंतर मराठीतील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक केलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची कथा ही लेखिका वैशाली नाईक यांनी लिहिली आहे. सोबतच रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या वंदना गुप्तेंचीच चर्चा आहे. नुकतीच त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी आपल्या लव्ह स्टोरीचाही एक हटके किस्सा सांगितला आहे. 

वंदना गुप्ते यांच्या लग्नाला नुकतीच 50 वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला होता. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी पुन्हा केलेल्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. वंदना गुप्ते यांनी अनेक चित्रपटांतून आणि मालिकांतून तसेच नाटकांमधून कामं केली आहेत. त्याचसोबत त्यांनी आता वेबसिरिजमधूनही अभिनय केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. नुकतीच त्यांची 'एका काळेचे मणी' ही वेबसिरिज प्रदर्शित झाली होती. या सिरिजमध्ये विशाखा सुभेदार, समीर चौघुले, प्रशांत दामले, ऋता दुर्गुळे असे लोकप्रिय कलाकारही होते. 

हेही वाचा - प्रेमाचे बंध! स्वानंदीच्या साखरपुड्याचे Unseen Photo समोर

नुकतीच त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा अवधूत गुप्ते यांच्यासोबत त्यांनी धम्मल गप्पा मारल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या लव्ह स्टोरीचाही एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ''साहित्य संघाने 'खडाष्टक' नावाचं नाटक बसवलं होतं. त्याचवेळी माझी आणि शिरीषशी ओळख झाली. शिरीष मला बघितल्याबरोबर म्हणाला,'कोण आहे रे ही पोरगी, चिकणी आहे.' मी लग्न करणार हिच्याशी असं तो मित्राला म्हणाला. मित्राने त्याला भानगडीत पडू नकोस. ती खूप कडक आहे तुला झेपणार नाही असा सल्ला दिला होता.''

पण मला जेव्हा शिरीषने प्रपोज केलं तेव्हा मी घरी येऊन सांगितलं. तेव्हा माझी मोठी बहीण भारतीने मला लग्न बिग्न करणं सोप्प नाही, विचार कर, असा सल्ला दिला होता. पण जेव्हा पहिल्यांदा शिरीष माझ्या घरी आला होता तेव्हा माझे वडील त्याला घेऊन स्टडी रूममध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी चर्चा केली होती.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''पण मला जेव्हा शिरीषने प्रपोज केलं तेव्हा मी घरी येऊन सांगितलं. तेव्हा माझी मोठी बहीण भारतीने मला लग्न बिग्न करणं सोप्प नाही, विचार कर, असा सल्ला दिला होता. पण जेव्हा पहिल्यांदा शिरीष माझ्या घरी आला होता तेव्हा माझे वडील त्याला घेऊन स्टडी रूममध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी चर्चा केली होती.”, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला होता.