अभिनेत्री जान्हवी कपूर अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो आले समोर?
भिनेत्री जान्हवी कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी तिच्या चित्रपटांनी आतापर्यंत काही खास कामगिरी केली नसली तरीही तिने तिच्या हॉट फोटोंमुळे इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोअर्स तयार केली आहेत. अभिनेत्री तिच्या करिअरसोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते.
Janhvi Kapoor Video : अभिनेत्री जान्हवी कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी तिच्या चित्रपटांनी आतापर्यंत काही खास कामगिरी केली नसली तरीही तिने तिच्या हॉट फोटोंमुळे इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोअर्स तयार केली आहेत. अभिनेत्री तिच्या करिअरसोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. जान्हवीच्या पर्सनल आयुष्याविषयी कायमच वेग-वेगळ्या अफवा उडत असतात. अलीकडेच ती तिरुपती मंदिरात तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली होती. यावेळी तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते तिच्या हातातली अंगठीने. ही अंगठी पाहिल्यानंतर सगळीकडे तिच्या लग्नाच्या अफवा पसरवल्या.
अलीकडेच जान्हवी आणि शिखर मंदिरात एकत्र देवासमोर पाया पडताना दिसले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक असा अंदाज लावू लागले की, दोघंही लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले होते. मात्र, या सगळ्या केवळ अफवाच आहेत. कारण अभिनेत्रीच्या जवळच्या एका सूत्राने मीडियामध्ये या सगळ्या चर्चांना पूर्ण बकवास म्हटलं आहे. बॉलीवूड बबलमधील एका रिपोर्टनुसार, तिच्या लग्नाच्या अफवांवर उलट जान्हवीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती मंदिराला भेट दिली. श्रीदेवी अनेकदा तिच्या वाढदिवसाला या मंदिरात जायच्या.
आईच्या निधनानंतर जान्हवी दरवर्षी या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी जाते. पण यावेळी तिच्या प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे ती १३ ऑगस्टला श्रीदेवी यांच्या वाढदिवसाला जाऊ शकली नाही. त्यामुळेच ती ईथे नंतर आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेली. रिपोर्ट्सनुसार, जान्हवीच्या हातातील अंगठी तिची आई श्रीदेवी यांची होती. ज्याला लोकांनी एंगेजमेंट रिंग मानलं. याचबरोबर तिच्या लग्नाच्याही अफवा वाऱ्या सारख्या पसरु लागल्या.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलाची चर्चा असते. कधी पार्टींमुळे तर कधी बिकनी फोटोंमुळे ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगतेय आणि यावेळी कारण ठरलंय ते तिच्या रिलेशनशिपचं.
जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, जान्हवीने तिच्या आईच्या स्मरणार्थ तिच्या आईची अंगठी घातली होती. उल्लेखनीय आहे की जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया 2022 पासून डेट करत आहेत. जरी ते त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगणं पसंत करतात. पण दोघंही अनेकदा एकमेकांच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसले आहेत. सोशल मीडियावरही ते एकमेकांशी जोडले गेले आहेत