मुंबई : प्रसिद्ध शो 'तू आशिकी'मध्ये पंक्ति आणि अहान मधला रोमांस चर्चेचा विषय बनलाय. मुख्य भुमिका करणारी अभिनेत्री पंक्ति म्हणजेच जन्नत जुबेर रहमानीने ऑनस्क्रीन किसिंग सीनमुळे गोंधळ झाला. या अभिनेत्रीने किसिंग सीनसाठी नकार दिला. त्यामुळे तिच्याजागी दुसर्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान जन्नत जुबेरला मोठी ऑफर मिळाली आहे. जन्नत आता राणी मुखर्जीचा सिनेमा 'हिचकी'मध्ये दिसणार आहे.



या सिनेमात तिला महत्त्वाची भुमिका आहे. आता ही भुमिका तिने कशी निभावली आहे हे २३ मार्चला सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.



आई निर्मात्यांशी भांडली 



 १६ वर्षाच्या जन्नत रहमानीने किसिंग सीनला विरोध केल्यानंतर ती चर्चेत आली. जन्नतची आई याप्रकरणी निर्मात्यांशी भांडली. यानंतर तिच्या वडिलांची बाजूही माध्यमांसमोर आली. 
 



 सध्या जन्नत शूटींगमध्ये व्यस्त आहे. आमची प्रोडक्शन टीमसोबत मिटींग होणार होती. पण त्याआधीच लीड रोलसाठी ऑडिशन सुरू केली. 


 



चांगली अभिनेत्री व्हावी



माझी मुलगी एक चांगली अभिनेत्री आहे. तिने स्क्रिनवर काय करायला हवे ? काय करायला नको ? याचा निर्णय आम्ही घेतलाय.


ती एक चांगली अभिनेत्री म्हणून समोर यावी. कोणता एडल्ट सीन किंवा किंसिंग सीनमुळे चर्चेत नको असे आम्हाला वाटत असल्याचेही ते म्हणाले.   


निर्मात्यांनी नियम मोडले 



आम्ही निर्मात्यांसोबत केलेल्या करारातील नियम त्यांनी मोडले. तरीही आम्ही सहकार्य केलं. त्यांची मागणी वाढत गेली.



त्यांना एडल्ट शो बनवायचा असेल तर आम्हाला ते मान्य नसल्याचे जन्नतच्या वडिलांनी सांगितले.