मुंबई : प्रेमाच्या बाबतीत सर्वांचंच नशीब चांगलं असतं, अशातला भाग नाही. बऱ्याचदा असं होतं, की सर्वकाही सुरळीत असतानाही प्रेमाचं हे नातं मात्र यशस्वी ठरत नाही. छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या दमदार अभिनयानं कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे, जेनिफर विंगेट. जेनिफरनं  'राजा को रानी से प्यार हो गया' य़ा चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. (actress jennifer winget bold photos )


पहिल्या चित्रपटाच्या वेळी तिचं वय 12 वर्षे इतकं होतं. यानंतर तिनं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय स्टारर 'कुछ ना कहो'मध्ये काम केलं. 


'कुसुम', 'कोई दिल में है', 'कसौटी जिंदगी की', 'क्या होगा निम्मो का', 'कहानी घर घर की', 'कहीं तो होगा', 'संगम', 'दिल मिल गए', 'तेरी मेरी लव स्टोरीज', 'सरस्वतीचंद्र', 'बेहद', 'बेपनाह' आणि 'बेहद 2' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये जेनिफरनं काम केलं. 


जेनिफर जितकी पडद्यावर गाजली त्याहूनही जास्त तिच्या खासगी आयुष्याची चर्चा झाली. 2012 मध्ये जेनिफरनं अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्याशी लग्न केलं. 



करणचं हे दुसरं, तर जेनिफरचं पहिलंच लग्न होतं. पण, हे लग्न फार काळ टीकलं नाही. पुढे 2014 मध्ये त्या दोघांचाही घटस्फोट झाला. पुढे करणनं अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी लग्नगाठ बांधली. जेनिफरशी लग्न करणं ही माझी चूक होती, असं करण या नात्यातून विभक्त झाल्यावर म्हणाला होता. 



आपल्या रुपानं सर्वांनाच घायाळ करणाऱ्या जेनिफरनं अमाप प्रसिद्धी मिळवली असली, तरीही तिच्या खासगी आयुष्यातील वादळं आत्मविश्वास मोडणारी होती, हे नाकारता येत नाही.