Emergency Gets Censor Certificate: कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या वादामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. कंगनाचा हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता पण शीख समुदायाच्या आक्षेपामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रकरण न्यायालयात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता कंगना रणौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवली जाणार आहे. 


कंगना रणौतने व्यक्त केला आनंद


अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या X वर एक पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. आनंद व्यक्त करताना ती म्हणाली की, 'आम्हाला हे कळवायला अतिशय आनंद होत आहे की सेन्सॉर बोर्डाकडून आम्हाला आमच्या 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू. तुम्ही दिलेल्या समर्थनाबद्दल धन्यवाद.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नेमकं प्रकरण काय? 


अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, शीख समुदायाने या चित्रपटावर आक्षेप घेतला. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात पोहोचले. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. 


त्याचबरोबर निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने एक कमिटी स्थापन केली. त्यानंतर चित्रपटामधील काही भाग कट करण्यास सांगितले. त्यानंतर काही भागांमध्ये बदल करून त्यामध्ये डिस्क्लेमर वापरण्यास देखील सांगितले होते. 


'इमर्जन्सी' चित्रपटात कोण -कोण?


अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये कंगना रणौतसह श्रेयस तळपदे आणि अनुपम खेर यांच्यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. कंगना रणौत या चित्रपटाची दिग्दर्शक आणि निर्माती देखील आहे.