मंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण रंगोली कायम वादाचा मुकुट डोक्यावर घेवून मिरवत असतात. काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त ट्विटमुळे रंगोली चंदेलचं ट्विटर  अकाऊंट काही दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी रंगोली चंडेल ही नेहमी चर्चेत असायची. बहिणीवर सतत होणारी टीका लक्षात  घेत, कंगनाने तिची पाठराखन केली आहे. प्रत्येक मुस्लीम दहशतवादी नसतो असं वक्तव्य करत तिने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 



या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'प्रत्येक मुस्लीम डॉक्टरांवर हल्ला करत आहे असं आमचं बिलकूल म्हणणं नाही. रंगोलीचं असं वक्तव्य कोठे आढळल्यास आम्ही दोन्ही त्यासाठी माफी मागू.' या देशात पंतप्रधान, गृहमंत्री यांना दहशतवादी म्हटलं जातं पण दहशतवाद्यांना दहशतवादी बोललं जात नाही, असं वक्तव्य देखील तिने यावेळेस केलं. 


त्याप्रमाणे देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी कंगनाने आपल्या व्हिडीओतून केली आहे. सध्या तिचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे.