मुंबई : 'दिया और बाती हम' अभिनेत्री कनिष्का सोनीने 16 ऑगस्ट रोजी एक फोटो शेअर केला. तिनं स्वतः शीच लग्न केल्याचं ती चर्चेत आली. भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट करून तिने सर्वांना चकित केलं. त्यानंतर लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. आता या ट्रोलर्सना कनिष्कानं सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनिष्कनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडेसहा मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'माझ्या लक्षात आले आहे की मला खूप विचित्र कमेंट येत आहेत. ज्यामध्ये मला सांगण्यात येत आहे की मी विज्ञानाला मागे टाकले आहे. मी कोणासोबत सेक्स करणार? त्यामुळे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला विज्ञानाबद्दल एवढंच माहिती असेल तर मी तुम्हाला सांगते की तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे. त्यानुसार मुलीला कोणाचीही गरज नाही. माणसाची गरज नाही आणि सर्वात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझेही लहानपणापासून लग्न करण्याचे स्वप्न होतं.'



पुढे कनिष्का म्हणाली, 'मी मोठ्या स्टार्ससोबत साऊथचे चित्रपट केले आहेत. कमर्शिअल एड्स केले पण नंतर कोणी काही बोललं नाही. भारतीय संस्कृतीवर माझा विश्वास असल्यानं मी आयटम नंबर नाकारले आहेत. जर मी ही आयटम साँग केले तर माझे कुटुंब आणि इतर लोक काय विचार करतील. माझी प्रतिमा काय असेल? माझ्या प्रतिमेबाबत मी नेहमीच जागरूक राहिले आणि तेव्हाच मी स्वतःसाठी निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही लोक त्यात ढवळाढवळ करू लागलात. माझ्या निर्णयाला चुकीचं म्हणू लागलात.'


पुढे कनिष्का म्हणाली, 'मी सध्या दुबईत राहते. मी आनंदी आहे लग्नानंतर मुली सुखी नसतात. 90 टक्के मुलींच्या बाबतीत असेच आहे. लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच त्यांचा घटस्फोट होतो. कुणाचा नवरा विनयभंग करतो. कुणाच्या नवऱ्यानं डोळा फोडला आणि हे 15-16 वर्षांच्या आयुष्यानंतर घडतं. दोन मुलांनंतर घडतं, हे ज्या मुलींसोबत घडलं त्या अतिशय प्रामाणिक, गृहीणी असतात. असे मी पाहिले आहे. त्यामुळे माझा पुरुषावरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. लोक म्हणतात की सगळेच असे नसतात. पण मी जिथे जिथे गेले, तिथे मी असचं पाहिलं आहे. फोटोतच सुखी कुटुंब दिसत असल्याचे पाहायला मिळतं.'


ती म्हणाली, 'मला भारतीय संस्कृती आवडते आणि या संस्कृतीचा भाग असलेलं सिंदूर आणि मंगळसूत्र, या गोष्टींसाठी मी कोणाची वाट पाहू शकत नाही. जर असा कोणी व्यक्ती आहे जो त्याच्या वक्तव्यावर टिकून राहत असेल तरी सुद्धा मी रिस्क घेणार नाही.'


हा व्हिडीओ शेअर करत कनिष्कानं दिलेलं कॅप्शनही चर्चेचा विषय ठरत आहे. 'मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्या स्वत:च्या लग्नाच्या निर्णयावर बरेच प्रश्न उपस्थित करत आहात, माझा भारतीय संस्कृतीवर खरोखर विश्वास आहे आणि म्हणूनच मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि सेक्सबद्दल विचार केला नाही. ही पोस्ट शेअर करताना मी गांजाचं सेवन केले असावे असे काही लोक म्हणतील, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी मनाने भारतीय आहे. चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ राहिल्यानंतरही मी कधीही दारू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन केले नाही. मला आनंद आहे की मी आता यूएसएमध्ये आहे आणि हॉलिवूडमध्ये माझे करिअर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.