कपूर कुटुंबाच्या लेकीला पुन्हा आनंदाची चाहूल, घटस्फोटीत अभिनेत्री करणार दुसरं लग्न? काय म्हणाली अभिनेत्री...
अभिषेकसोबत साखरपुडा तुटला, उद्योगपतीसोबतचं वैवाहिक नातंही तुटलं... अभिनेत्री करिष्मा कपूर करणार दुसरं लग्न? दुसऱ्या लग्नाला दुजोरा देत म्हणाली....
मुंबई : आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या फार जवळचा होते... नकळत त्या व्यक्तीने दिवसाची सुरूवात होते आणि संपतेही.. पण तिचं व्यक्ती जर आपल्यापासून दूर गेली, तर होणारं दुःख फार मोठं असतं. कपूर कुटुंबाची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत देखील असंच काही झालं आहे. करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही.
घटस्फोटानंतर करिश्माला सतत एक प्रश्न विचारण्यात येत आहे, तो म्हणजे 'अभिनेत्री दुसरं लग्न कधी करणार?' करिश्माने नुकताचं 'आस्क मी एनीथिंग' सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला.....
तेव्हा दुसरं लग्न कधी करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना करिश्मा म्हणाली 'परिस्थितीवर अवलंबून आहे...' सध्या तिचं हे उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नात नवरीचा कलीरा करिश्माच्या डोक्यावर पडला. तेव्हा करिश्माच्या चेहऱ्यावर असणार आनंद फार छान होता. त्यामुळे करिश्मा खरंच लग्न करणार आहे का? याकडे अनेक चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
करिश्माच्या खासगी आयुष्याबद्दस सांगायचं झालं तर, करिश्मा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा साखरपुड्याची घोषणा बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आली. पण साखरपुडा होण्याआधीचं त्यांचं नातं संपलं.
त्यानंतर तिच्या आयुष्यात संजय कपूरची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2016 साली त्यांचा घटस्फोट झाला आणि कायमचे दोघांचे मार्ग मोकळे झाले.