मुंबई : 'कलर्स'चॅनलवरील पॉप्यूलर शो 'बिग बॉस ११'मध्ये दिवसेंदिवस रोमांचक घडामोडी पाहायला मिळत आहेत. या वेळच्या सिझनचा टीआरपीदेखील वाढलेला पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान टीव्ही अॅक्ट्रेस कृतिका कामराने सलमान खानच्या या शोला बोरिंग म्हटल्याने सर्वच हैराण झाले आहे. 
 
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खानशी कोणी पंगा घेताना दिसत नाही. सलमान होस्ट असलेल्या बिग बॉसमध्ये सध्या नवा ट्वीस्ट आहे.


कंटेस्टंटचे फॅमिली मेंबर्स शेजारी बनून शो मध्ये आले आहेत. यावेळी कंटेस्टट्सनादेखील महत्त्वाचे टास्क दिले गेले आहेत. 


लक्झरी बजेट टास्क 


यावेळच्या लक्झरी बजेट टास्कमध्ये स्पर्धकांसोबत त्यांच्या नातेवाईकांचा हिस्साही महत्त्वाचा असणार आहे.


अनेकांना हा ट्वीस्ट आवडला पण अभिनेत्री कृतिका कामराला हे अजिबात आवडले नाहीए. तिने सोशल मीडियावर या शोला बोरिंग म्हटले आहे. 


बोरिंग एपिसोड 


'किती बोरिंग एपिसोड होता. अशा फॅमिली वाल्या अॅंगलने आम्ही पकलोय. आता हा शो पहिल्यासारखी छाप पाडणार  नाही.


हा वेगळाच नॉमिनेशन टास्क आहे आणि खूपच हलकी कॉमेडी यात आहे. झालेल गाणं पुरेस नव्हत का ?' असा प्रश्नही तिने विचारला आहे.